shivaji bandgar new sabhapati in karmala bajar samiti | Sarkarnama

नारायण पाटील गटाचे शिवाजी बंडगर बागल गटाला मिळाले अन् सभापती झाले!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

प्रा.शिवाजीराव बंडगर हे पाटील गटाचे अंत्यत विश्वास असल्याने शिवाजी बंडगर गट सोडु शकतात अशी कोणाच्या मनात शंका देखील आली नाही

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली असुन आमदार नारायण पाटील गटाचे प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी बंडोखोरी करत थेट बागल गटात प्रवेश करून सभापतीपद मिळवले आहे. उपसभापतीपदी चिंतामणी जगताप यांची निवड करण्यात आली आहे. 
यावेळी झालेल्या मतदानात बागल गटाच्या सभापती, उपसभापती पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी 9 मते मिळाली तर जगताप गटाकडुन शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार चंद्रकांत सरडे व उपसभापती पदाचे उमेदवार औदुंबर मोरे यांना 8 मते मिळाली. 

माजी आमदार जयवंतराव जगताप यांची 29 वर्षाची एकहाती सत्ता घालवण्यात बागल गट यश आले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.या निवडणुकीत झरे गणातुन पाटील गटाचे एकमेव सदस्य म्हणून प्रा.शिवाजीराव बंडगर विजयी झाले होते.
जगताप गटाला एकुण आठ जागा मिळाल्या (दोन बिनविरोध पकडुन) ,बागल गटाला आठ जागा मिळाल्या तर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाला एक जागा मिळाली, शिंदे गटाला माणना-या सावंत गटांची हमाल/तोलारची एक जागा बिनविरोध झाली.
निकाल लागल्यापासूनच बागल गटाने सत्ता स्थापनेसाठी वेगाने हलचाली सुरू केल्या होत्या. त्यांना फक्त एका जागेची गरज होती. 
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल ,विलासराव घुमरे, दिग्विजय बागल हे निकाल लागल्यापासून पाटील -जगताप गटाच्या संचालकांच्या संपर्कात होते .बागल गटाने सावंत गटाला हाताळण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याच वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांनाही बागल गटात प्रवेश केल्यास सभापती पदाची ऑफर दिली.

प्रा.शिवाजीराव बंडगर हे पाटील गटाचे अंत्यत विश्वास असल्याने शिवाजी बंडगर गट सोडु शकतात अशी कोणाच्या मनात शंका देखील आली नाही. माञ अचानक प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी घेतलेला पविञा आश्चर्यकारक समजला जात असुन हा आमदार नारायण पाटील यांना मोठा धक्का आहे.बागल गटाने चतुराईने केलेल्या राजकारणाने बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले आहे.
 

संबंधित लेख