बागल पार्टीकडून एक रुपयादेखील घेतलेला नाही: बंडगर

शेवटी मी म्हणत होतो तसेच झाले
बागल पार्टीकडून एक रुपयादेखील घेतलेला नाही: बंडगर

करमाळा : गेली पंचवीस वर्षे आमदार नारायण पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पाटील गटाची उभारणी करणा-या शिवाजीराव बंडगर यांनी अनपेक्षितपणे बंडाचा झेंडा हाती घेत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची खुर्ची हस्तगत केली. यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडल्या? बागल गटाने नेमकी काय जादू केली? 25 वर्षाच्या पाटील गटाच्या विश्वासाला तडा देऊन 'बंड'गरांनी हा निर्णय का घेतला?... 

बाजार समिती सभापती पदाच्या घडलेल्या घडामोडी विषयी बाजार समितीचे नुतन सभापती शिवाजीराव बंडगर यांच्याशी केलेली बातचीत. 

प्रश्न: आमदार नारायण पाटील गटाचे निष्ठावंत, विश्वासु सहकारी म्हणून आपली ओळख असताना आपण बागल गटात प्रवेश केला?

उत्तर: नारायणआबा पाटील यांना आमदार करायचं व त्यांचा गट वाढवायचा म्हणून रात्रीचा दिवस करणारा मी कार्यकर्ता आहे. गट वाढीसाठी सहका-यांना बरोबर घेऊन अकलूजला नोकरी सांभाळून काम केले आहे. नारायणआबांसाठी काम करत असताना मी उजनी धरणग्रस्तांची चळवळ, शिक्षकांची चळवळ, करमाळा तालुका सरपंच संघटना, धनगर समाजाची चळवळ, सोलापूर विद्यापीठ नामांतर, ढोकरी गावचा विकास अशा प्रश्नांवर झोकून देऊन सक्रिय राहून गट वाढवत राहिलो. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे नारायणआबा पाटील यांना मोठं करण्यासाठी सतत संघर्ष चालू ठेवला. मार्केट कमिटीच्या निवडणुकीत बागल गटाची सभापतीची ऑफर मला योग्य वाटली. तालुक्यातील एका महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी सोडू नये असे वाटल्याने निर्णय घेतला. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याची मला जाणीव आहे त्यांची माफी मागतो.

प्रश्न: आपला बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आहे? याबाबत आमदार नारायण , मोहीते पाटील यांच्याकडे बोट केले जातेय? 

उत्तर: आपला बोलविता धनी मोहिते पाटील अगर आमदार नारायणआबा पाटील आजिबात नाहीत. आपण आमदार पाटील यांना आगोदरपासुन सांगत होतो आमदार पाटील व जगताप युतीचा सभापतीपदाचा उमेदवार जयंतराव जगताप असतील तर ठरल्याप्रमाणे जयवंतराव जगताप यांना सभापती करण्यास मी बांधील आहे. पण मला मिळालेल्या माहितीनुसार जगताप यांच्याऐवजी दुसरेच कुणीतरी सभापती होणार होते. याची खाञी पटल्याचे मी आबांना सांगितले. आबा तुम्हाला मिसगाईड केल जातंय. पण पाटील यांनी माझे ऐकले नाही ते म्हणाले, तसे काही होणार नाही. आपल्याला जयवंतराव जगतापांनाच सहकार्य करायचे आहे. तुम्ही दुसरा काही विचार करायचा नाही. जगतापांनाच मतदान करा. शेवटी मी म्हणत होतो तसेच झाले. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे जयंवतराव जगताप यांचे ऐवजी चंद्रकांत सरडे सभापतीपदासाठी उमेदवार होते. त्यामुळे मी स्वतः अर्ज भरला. माझी सभापती होण्याची तीव्र इच्छा होती. महत्वकांक्षा होती, त्यामुळे मी स्वतःच हा निर्णय घेतला आहे. 

प्रश्न: या घडामोडीत अर्थिक देवाण -घेवाण झाल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का?

उत्तर:अजिबात नाही. मी विकणा-यांमधला नाही. सभापती पद देण्याऐवजी बाकी कोणतेही आश्वासण मला दिलेले नाही.
बागल पार्टीचे समर्थन मला मिळाले. त्यासाठी त्यांनी बागल गटात प्रवेश करण्याची अट घातली. मी बागल गटात प्रवेश केला आहे. बागल गटाने मला एक वर्ष सभापतीपद देण्याचा शब्द दिलेला आहे.
बागल पार्टी कडून एक रुपया देखील मी घेतलेला नाही, घेणार नाही.  

प्रश्न:बागल गटाने काय आश्वासने दिली?कोणी बोलणी घडवुन आणली?

उत्तर:शा प्रसंगी नेमके कोणाचे नाव घेणे उचीत होणार नाही, माझे मिञ सर्व गटात आहेत. तसे 
बागल गटातही अनेक मित्र आहेत. अनेकजण मला बोलत होते. पण जयवंतराव जगताप यांना सभापती करण्याचा शब्द आमदार पाटील यांनी दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी बागल गटातील मित्रांना मी नकार देत होतो. 
दरम्यान बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, मकाई अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याशी अधुन मधुन बोलणे होत होते.त्यांनी मला सभापती करण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे पुढील घडामोडी घडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com