युती नव्हती तेव्हाही मला अडचण नव्हती, आता तर नाहीच :  संदीपान भुमरे 

युती झाली हे बर झाले, पण युती नव्हती तेव्हाही मला अडचण नव्हती आणि आताही नाही. -संदीपान भुमरे
Sandipan-Bhumre
Sandipan-Bhumre

औरंगाबाद :  पैठण विधानसभा मतदारसंघातून मी चारवेळा निवडून  आलो आहे. या काळात केलेली विकासकामे आणि जनतेशी असलेला संपर्क यामुळेच हे शक्‍य झाले. गेल्या निवडणुकीत युती नव्हती तरी मला लोकांनी निवडून  दिले होते.

युती झाली हे बर झाले, पण युती नव्हती तेव्हाही मला अडचण नव्हती आणि आताही नाही. मतदारसंघातील विकासकामांची पावती म्हणून जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहीलच ,असा दावा पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती करून लढणार आहे. या निर्णयाचे पडसाद राज्यात उमटत आहे. विरोधकांनी युतीवर टिका करतांना दोन्ही पक्षांना लक्ष्य केले असले तरी मत विभाजन टळणार असल्यामुळे युतीचे स्वागतही होत आहे. 

जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 मध्ये युती तुटल्याचा फटका अनेक मतदारसंघात सेना-भाजपच्या उमेदवारांना बसला होता. मात्र शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी अशा कठीण परिस्थितीतही 25 हजार मतांनी विजय मिळवला.

विधानसभेच्या १९९५, १९९९ आणि २००४ अशा तीनही निवडणुकीत पैठणकरांनी भुमरे यांनाच पसंती दिली होती.२००९ मध्ये  राष्ट्रवादीकडून पराभव झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत २०१४ मध्ये  भुमरे यांनी पैठण मतदारसंघ पुन्हा खेचून आणला होता. 

युतीच्या निर्णयावर मत व्यक्त करतांना भुमरे म्हणाले, युती व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा होती, त्यामुळे मी देखील या निर्णयाचे स्वागतच करतो. तसे पहायला गेले तर मला गेल्या निवडणुकीत युती नसतांना जनतेने निवडूण दिले होते. आता तर युती आहे, त्यामुळे विजय आणखी सोपा होणार आहे. 

मध्यंतरीच्या काळात युतीच्या नेत्यांचे संबंध कमालीचे बिघडले होते. दोन्ही बाजूंनी स्वबळाची भाषा झाल्याने एकेका मतदारसंघात 10-12 इच्छूक तयारीला लागले होते. पण युतीमुळे त्यांना आता पक्ष ठरवेल त्या उमेदवाराचे काम करावेच लागेल आणि ते करतीलही असा विश्‍वास भुमरे यांनी व्यक्त केला. 

 प्रदेशाध्यक्षांचे काम इमाने इतबारे 

नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह नाही. अशावेळी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे एकमेकांचे काम करतील का? या प्रश्‍नावर भुमरे म्हणाले, निश्‍चितच काम करतील. नेत्यांनी घेतलेला युतीचा निर्णय एका चांगल्या दृष्टीकोनातून, मतांचे विभाजन टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. आता अनेकांची तयारी वाया जाणार असली तरी पक्षाचा आदेश दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बंधनकारच असणार आहे. 

आमचा पैठण  मतदारसंघ तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुकीत मी आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते त्यांच्यासाठी इमाने-इतबारे काम करतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही विधानसभेला माझ्यासाठी काम करतील ,असा दावा भुमरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com