Shiv sena leaders meet Ram Naik tomorrow to meet Yogi Adityanath | Sarkarnama

 शिवसेना नेते नाईकांना भेटले,आता योगी आदित्यनाथांना भेटणार 

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

उदधव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेच्या  विविध परवानग्या मिळाव्यात आणि कोणतेही विघ्न  न येता सभा पार पडावी  यासाठी आता या हालचाली सुरु आहेत . 

मुंबई: अयोध्येतील सभेसाठी शिवसेनेने तयारीचा भाग म्हणून उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची आज लखनौ येथे भेट घेतली.भाजपवर सातत्याने टीका करणारे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांनी या भेटीसाठी पुढाकार घेतला होता.

उदधव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेच्या  विविध परवानग्या मिळाव्यात आणि कोणतेही विघ्न  न येता सभा पार पडावी  यासाठी आता या हालचाली सुरु आहेत . 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यावेळी त्यांच्या समवेत होते.उदधव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेच्या दिवशी सुसज्ज तयारी असावी यासाठी सेनानेते उत्तर प्रदेशात सतत जात आहेत. उदया ता 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे अयोध्येकडे निघणार आहेत.

संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर उदया लखनौ येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या सभेच्या यशस्वीतेसाठी ही भेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे . 

संबंधित लेख