Shiv Sena facing hurdles in Ayodhya | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

अयोध्येत शिवसेनेच्या पायात खोडा   

सरकारनामा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी खासदार संजय राऊत , अनिल देसाई , सचिव मिलिंद नार्वेकर आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू अयोध्येत ठाण मांडून बसले आहेत .

मुंबई:  शिवसेनेच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यात खोडा घालण्याचा भाजपचा प्रयत्न असून भाजप शासित उत्तर प्रदेश सरकारने अद्याप आवश्‍यक परवानग्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमांना दिल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . 

येत्या 24 आणि 25 नोव्हेबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख राम मंदिराच्या मुद्यावर अयोध्येला जाणार आहेत. ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात काळी अडथळे येऊ नये यासाठी दोन आठवड्यांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीं लखनौ येथे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची ही भेट घेतली होती . 

याभेटीत योगी यांनी आवश्‍यक त्या परवानग्या मिळवून देऊ तसेच ठाकरे यांच्या दौर्यात कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे आश्वासन राऊत यांना दिले होते . मात्र आता उत्तरप्रदेश प्रशासनाकडून चालढकल करण्याचे धोरण अवलंबिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी खासदार संजय राऊत , अनिल देसाई , सचिव मिलिंद नार्वेकर आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू अयोध्येत ठाण मांडून बसले आहेत .

येत्या 24 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीतीरावर पूजन करण्यात येणार आहे . तसेच त्या ठिकाणी महाआरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे . हा संपूर्ण भाग सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणात आहे . शरयू नदीतीरावर पूजेला सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे . मात्र अयोध्या नगर निगम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप परवानगी दिलेली नाही . 

यासंदर्भात गेल्या बुधवारी चार आस्थापनांच्या आयुक्तांची बैठक होणे अपेक्षित होते . मात्र ही बैठक झाली नाही . याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी स्मारक केला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले तसेच उद्या शनिवारी किंवा सोमवारी परवानग्या मिळतील असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे. एकंदरीत शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपची राजकीय कोंडी होण्याची शक्‍यता असल्याने , आता भाजपने शिवसेनेला परवानग्यांसाठी प्रशासकीय खोड घालण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

संबंधित लेख