विकास गांडो थयो छे!; शिवसेनेचा हल्लाबोल

‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला.
Shiv Sena
Shiv Sena

मुंबई - गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’ असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीवरून सरकारवर टीका केली असून, घरचा आहेर दिला आहे. त्याच्या आधारेच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे, की देशाचे मोठे नुकसान सुरू आहे. यावर मी शांत बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेन. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असा तोफखाना यशवंत सिन्हा यांनी सोडला आहे. सिन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांची विधाने सोशल मीडियावर नेमलेल्या पगारी प्रचारकांच्या फौजा सोडून खोडता येणार नाहीत. ‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे,’ असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत आहेत, असे यशवंत सिन्हा म्हणतात. यावर आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील!

‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक मूर्ख व आपण तेवढे शहाणे या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकतात. 

विकास दर घसरत असताना नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असेही सिन्हा म्हणतात. सध्या अनेक बाबतीत सरकारी योजनांची वाताहत सुरू असली तरी जाहिरातबाजीचे डोस देऊन यशाचे ढोल वाजवले जात आहेत. उद्योग, मेक इन इंडियासारखे ‘मोदी फेस्ट’ कसे अपयशी ठरत आहेत व कोटय़वधी रुपयांची उधळण करूनही जनतेने या ‘फेस्ट’कडे कशी पाठ फिरवली आहे ते विदारक चित्र प्रसिद्धीमाध्यमांनी उघडे पाडले आहे. हिंदुस्थानातील उद्योगधंदे घसरणीस लागले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी नव्याने निर्माण होण्याऐवजी जे नोकरीत आहेत त्यांचाच रोजगार बुडत आहे. बँकांची अनेक खाती बुडाली आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव भयंकर वाढले आहेत. खासगी गुंतवणुकीत घट आली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. कृषीक्षेत्रही संकटात आहे. निर्यातीची अवस्था बरी नाही, असे यशवंत सिन्हा सांगत आहेत. सिन्हा हे अक्कलशून्य असतील तर त्यांनी केलेले आरोप सपशेल खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा. ‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे,’ असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. देशभरातील जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत आहेत, असे यशवंत सिन्हा म्हणतात. यावर आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com