Shiv sena angry with BJP mla Prashant Bamb"s statement | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

आमदार बंब यांच्या विधानाने विधानसभेत शिवसेना भाजप आमदार आमने सामने

ब्रह्मदेव चट्टे : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 एप्रिल 2017

मी सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही", बंब यांनी असे सांगताच सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विधानसभेत सेनेचे आमदार प्रशांत बंब यांनी उद्देशून जाब विचारू लागले.

मुंबई : विधानसभेत आज शिवसेना भाजपचे आमदार एकमेकाविरोधात चांगलेच भिडले होते. विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज नसल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगताच शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते.

आमदार प्रशांत बंब विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून चर्चा करताना म्हणाले, "मी म्हणतोय त्याला अनेक जणांचा विरोध होईल. तरीही मी सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही", बंब यांनी असे सांगताच सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विधानसभेत सेनेचे आमदार प्रशांत बंब यांनी उद्देशून जाब विचारू लागले. भाजप आमदार प्रशांत बंब गोंधळातच "मला माझे म्हणने मांडू द्या, मला बोलायलू द्या, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या" म्हणत अध्यक्षांकडे बोलण्याची मागणी करत उभे राहिले होते. सेनेचे आमदार शंभूराजे देसाई, सुनिल प्रभू, सुभाष साबणे यांच्यासह सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार प्रशांत बंब यांचे कर्जमाफी नको म्हणण्याचे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळणारे असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार आक्रमक होत बंब यांच्या जवळ जावून शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही ? याचा जाब विचारू लागले. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या जवळ येत सेनेच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. चांगलीच हमरी तुमरीची वेळ आली होती. सेनाचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले. गोंधळ वाढत असल्याचे बघून भाजपचे प्रतोद राज पुरोहित ही प्रशांत बंब यांच्या संरक्षण करण्यास धावले. गोंधळ वाढल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गप्पं बसण्याचे आदेश दिले.

संबंधित लेख