Shishir Shinde given important responsibility in shiv sena | Sarkarnama

शिवसेनेत शिशिर शिंदेंवर महत्वाची जबाबदारी

मृणालिनी नानिवडेकर 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

शिशिर शिंदे गेल्याच महिन्यात शिवसेनेत दाखल झालेले आहेत

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत स्वगृही शिवसेनेत परतलेल्या शिशिर शिंदे यांना पदार्पणातच मोठया जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

मार्मिकचा वर्धापनदिन हा शिवसेनेतला महत्वाचा सोहळा .आज षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या व्यवस्थापनाची संयुक्‍त जबाबदारी त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बादेकर यांच्यासमवेत सांभाळली. आज सकाळपासूनच ते कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे आज सकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात हजर झाले तेंव्हाही शिंदे तेथे होते. घरी परतलेल्याना सेनेत लगेचच महत्वाची जबाबदारी सोपवण्याचे असे प्रसंग कमी असतात,  असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख