SHISHAHI BUS | Sarkarnama

मळक्‍या शिवशाहीने राज्याची बेअब्रू ! 

ब्रह्मा चट्टे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचा दाखला देत एसटी महामंडळाची वातानुकूलिन शिवशाही बस धावते. मात्र सध्या मळलेल्या अवस्थेतील शिवशाही बसने राज्याची बेअब्र करण्यास सुरवात केली आहे. करारावर चालत असेल्या शिवशाही बस साफ करायच्या कुणी या महामंडळ व मालकांच्या वादात राज्याच्या अब्रूचे लक्तरे निघत आहेत. 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या वातानुकुलिन शिवशाही बस या सध्या गलिच्छ दिसत आहेत. महामंडळाच्या वैभवात भर टाकणाऱ्या गाड्यांच्या दुरूवस्थेमुळे एसटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थीत केले जात आहे. 

तब्बल 2 हजार 300 कोटी संचित तोटा असलेल्या एसटी महामंडळाने तोटा कमी करण्यासाठी वातानुकुलिन शिवशाही बसची सुरवात केली. राज्यात 2 हजार 'शिवशाही' बसेस एसटीच्या ताफ्यात टप्याटप्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत 838 शिवशाही बसेस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. या बस चालवण्यासाठी भाड्याने घेतल्या आहेत. गाडीचे भाडे, डिझेल व वाहकाचा पगार महामंडळाला द्यावा लागतो. 

शिवशाही बसेस सरासरी किमान रू 35 प्रती किमी दराने चालल्या तर परवडतात. सध्या शिवशाहीचे सरासरी उत्पन्न रू 42 प्रति किमी एवढे आहे. महामंडळाच्या तिजोरीत भर टाकणाऱ्या शिवशाही गाड्या स्वच्छ करायच्या कुणी या वादात मळक्‍याच गाड्या रस्त्यावरून धावत आहेत. राज्यातील महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये गाड्या स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा असतानाही गाड्या कोणी साफ करायच्या हा वाद रंगला आहे. एसटीचे मालक गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी महामंडळावर ढकलत आहेत, तर महामंडळ मालकांकडे बोट करत आहे. 

- सध्या 838 शिवशाही बसेस राज्यातील विविध मार्गांवर धावतात 
- 19 हजार बसचा ताफा 
- 1 लाख 6 हजार कामगार 
- आगार 250 
- एकूण 609 बसस्थानके 

ज्या शिवशाही बस गाड्या महामंडळाच्या स्वतःच्या आहेत, त्या गाड्या महामंडळ स्वच्छ करते, तर ज्या शिवशाही बसेस खासगी मालकांच्या आहेत, त्या बस साफ करण्याची जबाबदारी त्या मालकांवर आहे. 
- रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष एसटी महामंडळ 

संबंधित लेख