शिरुरचे दोन्ही सभापती हटेना! इच्छुकांचे देव पाण्यात!

शिरुरचे दोन्ही सभापती हटेना! इच्छुकांचे देव पाण्यात!

शिक्रापूर : शिरूर पंचायत समिती आणि शिरूर कृषी उप्तन्न बाजार समिती या दोन्ही संस्थांच्या सभापती-उपसभापती बदलाचे वारे शिरुर तालुक्यात जोरात वाहत आहे. वर्षभराचा कार्यकाल ठरलेल्या दोन्ही संस्थांमधील खांदेपालट ही आंबेगाव व शिरुर अशा दोन्ही मतदार संघांतील पदाधिका-यांमध्ये विभागून देण्याचा पेच पक्षश्रेष्ठींपुढे आहे.

हा मेळ कसा बसणार नाही याकडे लक्ष ठेवत एक वर्षाची मुदत संपूणही दोन्ही संस्थांचे सभापती-उपसभापती राजीनाम्याचे नावच घेत नसल्याने इच्छुकांनी मात्र देव पाण्यात ठेवल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. 

 शिरुर पंचायत समिती व शिरुर बाजार समितीच्या निवडणूका राष्ट्रवादीने सव्वा वर्षांपूर्वी एकहाती मारल्या. शिरुर व आंबेगाव अशा ज्या दोन मतदार संघात तालुका व तालुक्याचे राजकारण विभागले गेल्याने दोन्ही मतदार संघातील पदाधिका-यांना न्याय देण्याबाबत पक्षाची कसोटी वर्षभरापूर्वीही लागली होती आणि आताही लागलेलीच आहे.

हा मेळ घातताना पंचायत समितीसाठी आंबेगाव मतदार संघातील सुभाष उमाप यांची पंचायत समिती सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिरुरमधील मोनिका हरगुडे यांची निवड करुन न्याय देण्याचा प्रयत्न झाला. मात्र बाजार समिती पदाधिकारी निवडीत दोन्ही पदे शिरुरलाच दिली गेल्याने आंबेगाव मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी रुसल्याचे त्यावेळीच स्पष्ट झाले होते. एवढे होवूनही पक्षश्रेष्ठी काहीच बोलले नसल्याने प्रकाश पवारांनी व राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी राजीनामा अस्त्र उपसून आपली नाराजी नऊ महिन्यांपूर्वीच व्यक्त केली होती.

आता पुन्हा दोन्ही संस्थांच्या सभापती-उपसभापतींच्या वर्षभराच्या कार्यभारानंतर पदाधिकारी खांदापालटाची वेळ आल्याने कार्यकर्त्यांमध्ये व इच्छुक पदाधिका-यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे.

 
सभापती सुभाष उमाप हे लवकरच राजीनामा देणार असल्याची वृत्ते अधुनमधून आवर्जून चर्चेत आणली जातात. उमापही योग्य वेळी पाहू आणि बाजार समितीच्या पदाधिका-यांच्या खांदेपालटाबाबतही आपण लक्ष घालू असे  म्हणत असल्याने दोन्ही संस्थांमधील खांदेपालटीच्या राजकारणात खुपकाही अालबेल आहे असे समजण्याचे कारण नसल्याचे बोलले जाते.

 या सर्व घडामोडीत गेल्या चार महिन्यांपूर्वी मासिक मिटींगच्या प्रोसेडींग बुकातील उपस्थिती सह्यांवरुन उपस्थित झालेला शिरुर बाजार समितीतील वाद कसाबसा शांत करण्यात पुढाकार घेतलेले आंबेगाव मतदार संघातील युवा संचालक शंकर जांभळकर तसेच शिरुरच्या राजकारणात धुमाकुळ घालणारे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या स्थानिक राजकारणाला तितक्याच ताकदीने शह देणारे संचालक व शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे या दोघांबाबतीत काही प्रमुख उच्चपदस्थ पदाधिका-यांचे एकमत झाल्याचीही कुणकुण कानावर येते. मात्र बाजार समितीचे राजीनामे झाले तरच आपला राजीनामा आपण देवू अशी भूमिका सभापती सुभाष उमाप यांचे समर्थक हल्ली देत अाहेत. या सर्व घडामोडीत उमाप यांचा राजीनामा झाल्यासच बाजार समितीची खांदेपालट होवू शकते असाही काही जणांचा होरा आहे. या दोन्ही संस्थांचा पेच शिरुर राष्ट्रवादे, जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार आणि मानसिंग पाचुंदकर कसे सोडवतात ते औत्सुक्याचे राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com