shirhari ane | Sarkarnama

शिवसैनिकांनी श्रीहरी आणे यांची गाडी फोडली 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

औरंगाबाद ः वेगळ्या विदर्भ राज्यासह स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणारे राज्याचे माजी महाअधिवक्ते श्रीहरी अणे यांचा मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत आयोजित मेळावा उधळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी गुरुवारी (ता. 23) सायंकाळी पाचच्या सुमारास केला. या मेळाव्याला हजर राहण्यासाठी महसूल प्रबोधनीच्या दिशेने श्रीहरी आणे कारमधून जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडल्याने तणाव निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी कुठल्याही परिस्थितीत अणे यांचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा दिला आहे. 

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने स्वतंत्र मराठवाडा राज्य झाले पाहिजे या मागणीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक श्रीहरी आणे यांच्या हस्ते होणार होते. कार्यक्रमाची कुणकूण लागताच शिवसैनिकांनी तो उधळण्याची तयारी केली होती. दुपारी तीन वाजता द्वारकादास पाथ्रीकर, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ऍड. प्रदीप देशमुख, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, प्रा. बाबा उगले यांच्या उपस्थित हा मेळावा होणार होता. सायंकाळी पाच वाजता श्रीहरी आणे यांची कार कार्यक्रमस्थळाकडे निघाली असता तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला चढवत काचा फोडल्या.

या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आणे यांना चलेजाव चा इशारा दिला. वातावरण चिघळण्याची शक्‍यता लक्षात घेऊन श्रीहरी आणे यांची कार चालकाने माघारी फिरवली. त्यामुळे मराठवाडा मुक्तीमोर्चाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहताच ते माघारी फिरले. दरम्यान आणे यांच्या गाडीच्या काचा फोडल्यानंतर शिवसैनिक पळून गेले. त्यानंतर मोजक्‍या लोकांच्या उपस्थित मेळावा पार पडला. 

संबंधित लेख