shirdi saibaba | Sarkarnama

शिर्डीत साई तारांगण प्रकल्प उभारणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जून 2017

मुंबई : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने भव्य असा साईतारांगण हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. 

संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ऍड. मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके व कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. 

डॉ. हावरे म्हणाले, साईतारांगण ची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिकपणे तारे पाहण्याची आणि विविध सामुग्रीच्या बहुस्तरिय 3-डी प्रोजेक्‍शनमध्ये प्रदर्शनासाठी एक उच्च तंत्रमय तारांगण तयार करण्यात येईल. हे तारांगण साई भक्तांसाठी आकर्षण ठरेल. 

या साई तारांगणात 200 व्यक्तींची बैठक व्यवस्था असेल. यामध्ये आकाश दर्शनाबरोबर ग्रह, तारे व आकाशगंगेचे जे खेळ चालतात ते पाहण्याचे एक स्थान विद्यार्थ्यांना निर्माण होईल. शेकडो विद्यार्थ्यांना यामुळे ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करता येईल. या प्रकल्पाव्दारे मनोरंजना बरोबरच शैक्षणिक महत्व वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील मुंबई नंतर शिर्डी येथील हे तारांगण आधुनिक तारांगण असेल. 
 
संबंधित लेख