shirdi-cm-fadanvis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

दोन महिन्यांत वनवासींना जमिनीची मालकी देणार : फडणवीस

सतीश वैजापूरकर
रविवार, 30 सप्टेंबर 2018

वनवासी बांधवांच्या जल, जमीन व जंगलावरील हक्क आबादित ठेवणारा कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पुढील दोन महिन्यांत जमिनीच्या पट्ट्यांची मालकी वनवासी बांधवांकडे सुपूर्द केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

शिर्डी (जि. नगर) : वनवासी बांधवांच्या जल, जमीन व जंगलावरील हक्क आबादित ठेवणारा कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पुढील दोन महिन्यांत जमिनीच्या पट्ट्यांची मालकी वनवासी बांधवांकडे सुपूर्द केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

साई शताब्दीवर्षानिमित्त साईसंस्थानच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराम उरॉंव, महंत रामगिरी महाराज, मेघालयचे माजी राज्यपाल रणजितशेखर मुशारी, स्वागताध्यक्ष सुरेश कोते, साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, वनवासी बांधवांना सुवर्णमय इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. देशाच्या जल आणि जंगलावर परकियांनी अतिक्रमण केले, त्यावेळी देशाच्या संरक्षणासाठी ही मंडळी पुढे आली. आपल्या विभिन्न चाली-रिती व बोली भाषा त्यांनी जपल्या आहेत. आपण सारे भारतमातेचे सुपूत्र आहोत, असा एकात्मभाव केंद्रस्थानी ठेवून वनवासी कल्याण आश्रमाने देशभरातील वनवासी क्षेत्रात सेवा क्षेत्राचे जाळे विणले आहे.
 

संबंधित लेख