शिर्डी विमानतळाला श्री साईबाबांचे नाव

शिर्डी विमानतळाला  श्री साईबाबांचे नाव

मुंबई : शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता हे विमानतळ लवकरच सुरु करण्याचे नियोजन आहे. या विमानतळाच्या नामकरणाचा ठराव श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यास मंजुरी दिली आहे.

विमानतळांच्या नावात बदल करण्याची बाब केंद्राच्या अखत्यारित येते. नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शिफारशीसह हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. 

शिर्डी (जि.नगर) येथे श्री साईबाबा समाधी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. भाविकांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' हे विमानतळ उभारले आहे. श्री साईबाबा संस्थानने या विमानतळाच्या उभारणीसाठी दिलेल्या निधीतून धावपट्टी, टॅक्‍सी वे, टर्मिनल इमारत, पायाभूत सुविधा, संरक्षक भिंत इत्यादी कामे करण्यात आली आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com