आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये नाराज; बंडाच्या तयारीत

आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये नाराज; बंडाच्या तयारीत

आ. शिवाजीराव नाईक यांच्या आजवरच्या एकूण वाटचालीचा, अभ्यासाचा विचार करुन त्यांना भाजप मोठी जबाबदारी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना हुलकावणीच देण्यात आली. आता ही हुलकावणी त्यांना पक्षाने दिली की विरोधकांनीच त्यांच्यावर कुरघोडी केली, हा संशोधनाचाच विषय बनला आहे. मात्र आ.नाईक यांना डावलल्याने ते नाराज आहेत. सत्ताधारी पक्षात असतानाही कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. त्यामुळे आ. नाईक हे शांत बसणाऱ्यापैकी नसल्याने ते बंड करुन कॉंग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा आहे.

कोल्हापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या शक्‍तीमान नेत्यांचा विरोध मोडीत काढत शिराळा विधानसभा मतदार संघात शिवाजीराव नाईक यांनी कमळ फुलवले. त्यांचा पंचायत राजमधील गाढा अभ्यास, कामाची निटनेटकी पध्दती, प्रशासनावरील पकड, बारीक-सारीक गोष्टींचा असलेला अभ्यास पाहून त्यांना लाल बत्ती मिळेल, अशी मतदार संघातील जनतेला अपेक्षा होती. मात्र चार वर्षे उलटली तरी भाजप नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आमदार नाईक आता केव्हा बंड करणार आणि कॉंग्रेसच्या पताका खांद्यावर कधी घेणार, याची चर्चा मतदार संघात सुरु आहे.

वाळवा, शिराळा तालुके हे बंडखोरांचे तालुके आहेत. अत्यंत टोकाची ईर्षा, सुडाचे राजकारण, भाउबंदकी गटागटात भिनली आहे. किंबहुना नेत्यांनीच ती आपल्या कार्यकर्त्यांत भिनवली आहे. या सर्वातून राजकीय मुसंडी मारणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. तरीही शिराळा विधानसभा मतदार संघात भाजपचे कमळ घेवून ही किमया साधली ती शिवाजीराव नाईक यांनी. एकाबाजूने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व मुख्यमंत्रीपदावर दावेदारी असणारे आ. जयंत पाटील, दुसऱ्या बाजूने कटटर विरोधक असलेले राष्ट्रवादीचेच मानसिंग नाईक व तिसऱ्या बाजूने मोठा राजकीय वारसा लाभलेले सत्यजित देशमुख या सर्वांनी केलेली कोंडी फोडून आ. शिवाजीराव नाईक यांनी तालुक्‍यात कमळ फुलवले. तसेच लोकसभेलाही खासदार राजू शेटटी यांना मोठी ताकत दिली. आ.नाईक यांच्या आजवरच्या एकूण वाटचालीचा, अभ्यासाचा विचार करुन त्यांना भाजप मोठी जबाबदारी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र सातत्याने त्यांना हुलकावणीच देण्यात आली. आता ही हुलकावणी त्यांना पक्षाने दिली की विरोधकांनीच त्यांच्यावर कुरघोडी केली, हा संशोधनाचाच विषय बनला आहे. मात्र आ. नाईक यांना डावलल्याने ते नाराज आहेत. सत्ताधारी पक्षात असतानाही कामं होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. आ. नाईक हे शांत बसणाऱ्यापैकी नसून ते बंड करुन कॉंग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com