shirajshingh chauhan said bjp will win in mp | Sarkarnama

मध्य प्रदेशात भाजपच चौथ्यांदा सत्तेवर : चौहान 

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

दतिया (मध्य प्रदेश), ता. 8 (पीटीआय) : मध्य प्रदेशात भाजपच चौथ्यांदा सत्तेवर येईल, असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी व्यक्त केला. या राज्यात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात काट्याची लढत होण्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी नोंदविला आहे. मात्र, चौहान या अंदाजांशी सहमत नाहीत. 

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झाल्यामुळे चौहान यांनी आज येथील प्रख्यात श्री पीतांबरा पीठाचे दर्शन घेतले. नंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. ते म्हणाले, ""मी दिवसभर लोकांमध्येच वावरत असतो, त्यामुळे मी खरा सर्व्हेअर आहे. मध्य प्रदेशात भाजपच चौथ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा मला विश्‍वास आहे. समाजातील सर्व थरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.'' 

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, 11 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत. काल झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-कॉंग्रेस यांच्यात काट्याची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

संबंधित लेख