७०:३० फॉर्म्यूला मान्य होईपर्यंत शिवसेनेचे दूध आंदोलन सुरूच राहणार

दूध उत्पादकांना पाच रुपयांच्या दरवाढीच्या मागणीसाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनात खासदार शिवाजीराव आढळराव व शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांच्या सूचनेनुसार चौफुला (ता.शिरूर) येथे आंदोलन करण्यात आले.
७०:३० फॉर्म्यूला मान्य होईपर्यंत शिवसेनेचे दूध आंदोलन सुरूच राहणार

शिक्रापूर : 'आम्हा दूध उत्पादक शेतक-यांसाठी आता ७०:३० फॉर्म्यूलाच पाहिजे. हा फॉर्म्यूला लागू होईपर्यंत कुणाही दुध प्रकल्पवाल्यांना आम्ही दूध घालणार नाही. या निर्णयाबाबत पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर जो पर्यंत निर्णय घेत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार येथील दूध आंदोलनात उतरलेल्या शिवसेनेने व्यक्त केला.

दूध उत्पादकांना पाच रुपयांच्या दरवाढीच्या मागणीसाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनात खासदार शिवाजीराव आढळराव व शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांच्या सूचनेनुसार चौफुला (ता.शिरूर) येथे आंदोलन करण्यात आले. स्थानिक दूध उत्पादकांच्या भावनांना वाट करुन देण्यासाठी शिवसेना जिल्हा उपसपंर्कप्रमुख अनिल काशिद, तालुकाध्यक्ष पोपट शेलार व समाधान डोके यांच्या भाषणांनी सुरवात झालेल्या या आंदोलनाचे दरम्यान माजी सरपंच सोपान जाधव, निलेश जगताप, आनंदराव हजारे, बी.आर. क्षीरसागर, शामराव तिखे, जितेंद्र खंडाळे, बापूसाहेब मासळकर, ज्ञानेश्वर मलघे, नितीन दरेकर, बाबु थिटे, अशोक वाघ, जयदीप ताठे, आदींनी तीव्र भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

दरम्यान दूध उत्पादकांच्या दुधाची खरी मलई दूध प्रक्रीया प्रकल्प खात असून ते लोणी व बायप्रोडक्ट तयार करुन शिल्लक दुध दुप्पट बाजार भावाने विकतात. याबाबत सरकारने आता केवळ अनुदानाचा नाही तर ७०:३० चा फॉर्म्यूला लागू करण्याचा निर्णय घेईपर्यंत आमचे आंदोलन सुरू ठेवले जाणार असल्याचे काशिद, शेलार व डोके यांनी सांगितले. दरम्यान भाषणांनंतर चाकण-शिक्रापूर रस्त्यावर महादेव जानकर यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करीत प्रतिकात्मक तीव्र भावना उपस्थित शेतक-यांनी व्यक्त केल्या. 

शिवसेनेची मुंबईसाठी योजना तयार..!
दूध प्रक्रीया प्रकल्पांकडूनच खरी पिळवणूक शेतक-यांची केली जाते. यासाठी मुंबईतील काही सोसायट्यांना पुणे जिल्ह्यातून चांगल्या प्रतीचे दूध पुरवठा करण्याबाबत शिवसेनेकडून योजना तयार करण्याचे काम सुरू असून शेतक-यांना उत्तम भाव आणि ग्राहकांना उत्तम दुध देण्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून हे नवीन पाऊल लवकरच उचलण्यात येणार असल्याची माहिती काशिद, शेलार व डोके यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com