shijirao nilengekar bhukhand | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री पाटील-निलंगेकरांच्या मित्र मंडळाला दणका 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : वांद्रे पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील 11 हजार चौरस मीटरचा भूखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मराठवाडा मित्र मंडळाला 1981 मध्ये देण्यात आला होता; मात्र मंडळाने "लीज'च्या नियमांचे उल्लंघन करत 35 वर्षांपासून भूखंडावर कोणतेही बांधकाम न केल्याने हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. 

मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 1965 मध्ये मराठवाडा मित्र मंडळाची स्थापना झाली. मराठवाड्यातून मुंबईत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आणि वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी मराठवाडा मित्र मंडळाने सरकारकडे मुंबईत भूखंड मिळण्यासाठी पाठपुरावा केला. 

10 वर्षांनंतर सरकारने मंडळाला वांद्रे पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुमारे 11 हजार चौरस मीटरचा भूखंड दिला. या भूखंडावर तंत्र शिक्षण परिषदेच्या अटी-शर्तींनुसार अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्यास सरकारने 2009 मध्ये मंजुरी दिली होती. 

त्यानुसार 2010 मध्ये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भूखंडाचा ताबा घेण्याकरिता मंडळाने 11 कोटी 82 लाख 50 हजारांची रक्कम अदा केली; मात्र 2010 मध्ये मंडळाने हा भूखंड विकासासाठी बिनशर्त एका विकसकाला दिल्याचा आरोप त्या वेळी मंडळावर झाल्याची चर्चा होती. 

ज्या उद्देशासाठी ही जागा मिळाली, त्या जागेवर मराठवाडावासीयांसाठी मराठवाडा भवन उभे राहण्याकरिता मंडळाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. तसेच सुमारे 35 वर्षांत या जागेवर कोणतेही बांधकाम न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने हा भूखंड ताब्यात घेतला आहे. 

संबंधित लेख