Shevgav Election BJP Wins | Sarkarnama

शेवगाव नगरपरिषदमध्ये फुलले भाजपचे कमळ

सचिन सातपुते 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

शेवगांव नगरपरिषदेमध्ये ता.१ रोजी प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डाँ. विक्रम बांदल यानी नगरसेवकांची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या दोन्ही पदाची मुदत ८ आॅगस्ट रोजी संपत असल्याने निवडणूक झाली. त्यात नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक विजयमाला कैलास तिजोरे, तर भाजपकडून राणी विनायक मोहिते यांचे दोन अर्ज दाखल झाले होते.

शेवगांव : शेवगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या राणी विनोद मोहिते यांची तर उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरेसवक वजीर बाबुलाल पठाण यांची निवड झाली.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने नगरपरिषदेवर भाजपचा प्रथमच झेंडा फडकला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांना दिलेला हा अनपेक्षित धक्का मानला जातो.

शेवगांव नगरपरिषदेमध्ये ता.१ रोजी प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डाँ. विक्रम बांदल यानी नगरसेवकांची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या दोन्ही पदाची मुदत ८ आॅगस्ट रोजी संपत असल्याने निवडणूक झाली. त्यात नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक विजयमाला कैलास तिजोरे, तर भाजपकडून राणी विनायक मोहिते यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये तिजोरे यांना ९ तर मोहिते यांना १२ मते मिळाली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपडून अपक्ष नगरसेवक वजीर पठाण, शारदा काथवटे व कमलेश गांधी यांनी तर राष्ट्रवादी कडून अपक्ष नगरसेवक सागर फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

मात्र काथवटे व गांधी यांनी मुदतीत माघार घेतल्याने पठाण व फडके यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये फडके यांना ९ तर पठाण यांना १२ मते पडल्याने नगराध्यक्षपदी राणी मोहिते व उपनगराध्यक्षपदी वजीर पठाण यांची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी जाहीर केली. 

या नगरपरिषेदत राष्ट्रवादीचे ९, भाजप ८ व अपक्ष ४ असे बलाबल होते. प्रथम नगराध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादीने तीन अपक्षांना बरोबर घेवून मिळवला होता. मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शब्बीर शेख, उमर शेख, अजय भारस्कर यांनी विरोधात मतदान करुन पक्षाला घरचा आहेर दिला.गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना ही दोन्ही पदे गमावण्याची वेळ आली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे यांनी अवघ्या दोनच दिवसात रणनिती आखत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांना त्यांच्या तालुक्यातच मात दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख