shevgaon-police-inspector-cheating-case | Sarkarnama

आमदारांचा नातेवाई असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकाला सहा लाखांचा गंडा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आमदारांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव येथे घडला. 

शेवगाव (जि. नगर)  : आमदारांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव येथे घडला. 

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ओमासे यांच्या फिर्यादीवरुन शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे ( रा. गदेवाडी, ता. शेवगाव ) याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओमासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, इसारवाडे यांनी १० फेब्रुवारी २०१८ पासून ते ५ आॅगस्ट २०१८ या कालावधीत आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाईल ( क्रमांक ९४२३२४९१९१) वर वेळोवेळी संपर्क करुन एका अज्ञात साथीदारांच्या मदतीने हुबेहुब आमदार विनायक मेटे यांच्या आवाजात वेगेवगेळ्या कारणासाठी पैशाची मागणी केली. 

साक्षीदाराकडून सहा लाख २० हजार रुपयांची रक्कम घेवून फसवणूक केली आहे. अशा फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात इसारवाडे व एका अज्ञात इसमाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर हे करीत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख