शेवगावचे PI गोविंद ओमासेंवर ही वेळ कां आली? 

आमदाराचे नातेवाईक असल्याचे भासवून शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याने सव्वा सहा लाखांचा गंडा घातल्याची फिर्याद दिलेल्या शेवगावचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे हे एका शेतात पाणी देत असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
शेवगावचे PI गोविंद ओमासेंवर ही वेळ कां आली? 

नगर : आमदाराचे नातेवाईक असल्याचे भासवून शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याने सव्वा सहा लाखांचा गंडा घातल्याची फिर्याद दिलेल्या शेवगावचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे हे एका शेतात पाणी देत असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. 

हे शेत इसारवाडे यांचेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फसवणूक केलेल्याच्या शेतात पोलिस निरीक्षक पाणी कसेकाय भरतात, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच ओमासे यांची खाकी वर्दी त्यांच्याच घरातून चोरी गेल्याची फिर्याद ओमासे यांनी दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनू लागले आहे. 

ओमासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी सकाळी त्यांच्या घरातील कपाटातून 625 रुपये किमतीचे दोन सरकारी खाकी ड्रेस, कॅप, लाल रंगाचे बूट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. निरीक्षकाच्याच घरातून ड्रेस चोरीस गेल्याच्या घटनेने शेवगावमध्ये चर्चेला उधाण आले आहे. 

दरम्यान, इसारवाडे यांच्या पत्नीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलिस निरीक्षक ओमासे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. इसारवाडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच ओमासे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून, पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी तिने अधीक्षकांकडे केली आहे. 

पोलिस निरीक्षक ओमासे हे पोलिस ड्रेसवर शेतात पाणी भरतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे शेतही इसारवाडे यांचेच असल्याचे सांगितले जाते. मग ओमासे इसारवाडे यांच्या शेतात काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच इसारवाडे व ओमासे यांची मैत्री होती, असे इसारवाडे यांच्या पत्नीने निवेदनातून म्हटले आहे. असे असताना इसारवाडे याच्या विरोधात ओमासे यांनी फिर्याद कशी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे शेवगाव तालुक्‍यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com