shetty talks about gopinath munde | Sarkarnama

...तर गोपीनाथ मुंडे यांनी बंड केले असते : खासदार राजू शेट्टी 

उमेश घोंगडे
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : केंद्र व राज्य सरकारमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहता गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनी या व्यवस्थेविरूद्ध निश्चितपणे बंड केले असते, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केले.  "सरकारनामा फेसबूक लाईव्ह'मध्ये बोलताना त्यांनी केंद्र सरकारचा कारभार हा हुकूमशाही पद्धतीचा असल्याची टीका त्यांनी केली. मुंडे हे मुळातच बंडखोर नेते होते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ते बंड केल्याशिवाय राहू शकले नसते, असे त्यांनी सांगतिले. 

मुंडे हे समाजाशी नाळ असलेले नेते होते. त्यामुळे मुंडे असते तर राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थितीच निर्माण झाली नसती, असे सांगत परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे हयात असते तर मला एनडीए सोडण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी स्पष्ट केले.

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे, यावर शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपचा मुख्यमंत्री हा दिल्लीतील सत्तेच्या हातातील बाहुले झाला आहे. त्यामुळे कोणी मुख्यमंत्री झाला तरी काही फरक पडणार नाही. अर्थात गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. त्यांनी अशा दडपशाहीला न जुमानता बंड केले असते, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी पुन्हा जुळवून घेण्याचे दोर आपण पूर्णपणे कापून टाकले आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुमच्याशी चर्चा केली तर परत एनडीएत याल का, या प्रश्नावर ते म्हणाले की मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतो. त्यामुळे त्या पक्षाचे इतर नेते मला फोन करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्या दूध आंदोलनावर टीका केली. यावर बोलताना ते म्हणाले की त्यांच्याविषयी आलेल्या अनुभवाचा उपयोग सरकारने करून घेतलेला दिसतोय. त्यामुळेच त्यांना दूध प्रश्नाच्या चर्चेत सहभागी करून घेतले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला.    
 
संबंधित लेख