Shetkari Sanghatana Leaders Criticism on Sadabhau Khot - Raju Shetty | Sarkarnama

शेट्टी, सदाभाऊ गवतातील हिरवे साप : कालिदास आपेट 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सातारा : "नाव स्वाभिमानी आणि करतात बेईमानी अशी अवस्था असलेल्या राजू शेट्टींमुळेच एकरकमी एफआरपी मिळणे अशक्‍य झाले आहे. त्यांनी मुख्यमंत्रासोबत बसून 80 टक्के एफआरपी दिली तरी चालेल अशी बोलणी केली. शेट्टी, सदाभाऊ हे गवतातील हिरवे साप आहेत," अशी टीका शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली. 

क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी हे समजून घेणे गरजेचे आहे. सदाभाऊंच्या ऊस परिषदेला स्वत: मुख्यमंत्री येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ऊस परिषद कशासाठी एफआरपीचे 255 कोटी रूपये शासनाकडून शेतकऱ्यांना येणे आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी उमेदवार निवडुन लोकसभेत पाठवा. भाजप सरकारच्या भ्रष्टचारात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनावालेही सहभागी आहेत. या भामट्यांना सत्तेपासून दूर ठेवा." 
 
संबंधित लेख