shetakari sanghtana workers challenge tanaji sawant | Sarkarnama

`राजू शेट्टी हे मोदींना आव्हान देणारे नेते; तुम्ही खूप किरकोळ आहात!`

संपत मोरे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे : खासदार राजू शेट्टी हे पंतप्रधान मोदींना चॅलेंज करणारे नेते आहेत. तुम्ही त्यांच्यापुढं खूप किरकोळ आहात, राजू शेट्टी सूर्य आहेत तर तुम्ही काजवा आहात," अशा शब्दात राजू शेट्टी यांचे कार्यकर्ते रणजित बागल यांनी आमदार तानाजी सावंत यांना सुनावले आहे.

खासदार राजू शेट्टी आणि आमदार तानाजी सावंत यांच्या वादात गादेगाव येथील रणजित बागल यांनी उडी घेतली आहे, त्यानी सावंत यांना जाहीर पत्र लिहून इशारा दिला आहे.

 "शेट्टींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. अनेक धक्के आले. टिकाटिपण्ण्या झाल्या, वादळं आली. पण राजू शेट्टी हा शेतकऱ्याला न्याय देणारा वटवृक्ष अजूनही  भक्कमपणे उभा आहे .ते जनतेतून  प्रचंड निवडून येतात आणि तुम्हाला  सोनारी या गावातील ग्रामपंचायत ही राखता आलेली नाही."असे या पत्रात बागल यांनी पत्रात म्हटलं आहे.

"सावंत,ही जनता गरीब आहे पण; लाचार नाही. सामान्य नागरिकांना जर तुम्ही स्वतःच्या घरचे नोकर समजत असाल तर ध्यानात ठेवा हीच जनता ज्याला उचलुन खांद्यावर घेते तिचं तुम्हाला जनता तुम्हाला आगामी काळात पायदळी तुडविल्याशिवाय राहणार नाही. तुमचा वाचाळवीरपणा जर असाच चालू राहिला तर तो दिवस सुध्दा तुमच्यासाठी लांब नसेल ."असा इशारा बागल यांनी दिला आहे.
 
संबंधित लेख