ओल्या दुष्काळासाठी पाटणकरांनी पेटवली शेकोटी 

पाटण तालुक्‍यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शेकोटी आंदोलन केले.
ओल्या दुष्काळासाठी पाटणकरांनी पेटवली शेकोटी 

पाटण : गेले अडीच महिने पाटण तालुक्‍यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शेकोटी आंदोलन केले. 

विक्रमबाबा म्हणाले, पाटण तालुक्‍यात सात जूनपासून सलग अडीच महिने मुसळधार सुरू आहे. 15 जुलैपासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. या बरोबर वन्यप्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत. म्हणून पाटण तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर झाला नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी प्रा. रविंद्र सोनावले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे, दादासाहेब कदम, बाळासाहेब देसाई, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, सुरेश भोसले, संतोष इंदुलकर, सचिन देसाई, चंद्रकांत चौधरी, चंद्रकांत टोळे, अमर लोहार, पंकज नायकवडी, विकास घाडगे, सुनील चौधरी, अनिल टोळे, आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com