shekhar gaykwad appointed as sugar commissioner | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शेखर गायकवाड राज्याचे नवीन साखर आयुक्त

संदीप नवले पाटील
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची अखेर 1 जानेवारी पासून राज्य शासनाच्या साखर आयुक्तपदी पूर्णवेळ नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची अखेर 1 जानेवारी पासून राज्य शासनाच्या साखर आयुक्तपदी पूर्णवेळ नेमणूक करण्यात आली आहे.

पूर्वीचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभार कोणाकडे दिले जाणार यांची चर्चा सुरू होती. मात्र प्रशासन विभागाने भूजलचे संचालक शेखर गायकवाड यांचे कडे 1 डिसेंबर पासून साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार सोपविला होता. त्यांनी 15 डिसेंबर रोजी हा अतिरिक्त पदभार स्वीकारलेला आहे. मात्र राज्यातील साखर कारखान्यांची संख्या आणि साखर उद्योगा पुढील आव्हाने यामुळे राज्याला पूर्ण वेळ साखर आयुक्त मिळावा अशी मागणी सातत्याने होत होती.

सरकारने त्यांना १ जानेवारी 2019 पासून त्यांना अधिकालीक वेतन श्रेणीत पदोन्नती देऊन त्यांची राज्याचे साखर आयुक्त पदी पूर्ण वेळ नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर श्री.गायकवाड यांच्याकडे साखर आयुक्तालयाचा मुख्य तर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.

चर्चेला पूर्ण विराम
मध्यंतरी नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने तेच साखर आयुक्त होतील अशी चर्चा रंगली होती.श्री. मुंढे यांची नुकतीच एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने ही चर्चा बंद झाली होती. मुंढे नाही तर मग कोण अशी चर्चा सुरू असतानाच शेखर गायकवाड यांची आज पूर्ण वेळ साखर आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

संबंधित लेख