shekahr gore absent ncp programme | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शेखर गोरेंचा पत्ता कुठे ?; अजितदादांच्या मेळाव्यालाही दांडी! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 जुलै 2017

माण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शेखर गोरे जिल्हा परिषद निवडणुकीपासून राजकीय पटलावर सक्रिय नाहीत. साताऱ्यात पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला ते उपस्थित नव्हते. त्यामुळे शेखर गोरे नक्‍की कुठे आहेत ? आणि अजितदादांच्या मेळाव्याला ते कां आले नाहीत, हा विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चर्चेचा बनला आहे. 

सातारा : माण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शेखर गोरे जिल्हा परिषद निवडणुकीपासून राजकीय पटलावर सक्रिय नाहीत. साताऱ्यात पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला ते उपस्थित नव्हते. त्यामुळे शेखर गोरे नक्‍की कुठे आहेत ? आणि अजितदादांच्या मेळाव्याला ते कां आले नाहीत, हा विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चर्चेचा बनला आहे. 

शेखर गोरेंच्या माध्यमातून माण तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सक्षम नेता मिळाला. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवेश झाल्या झाल्या सांगली-सातारा मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत शेखर गोरेंच्या विरोधात कॉंग्रेसचे मोहनराव कदम यांची उमेदवारी होती. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघातून विजयासाठीची सर्वाधिक मते असूनही शेखर गोरेंचा पराभव झाला. राष्ट्रवादीतील बहुतांशी नेत्यांनी शेखर गोरेंच्या विरोधात काम केले. पराभवानंतर श्री. गोरे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फारसे रमले नाहीत. उलट व्यवसायाच्या निमित्ताने ते झारखंड, उत्तराखंडच्या दौऱ्यावर असतात. जिल्हा परिषद निवडणुकीत काहीवेळ ते सक्रिय दिसले, मात्र नंतर सातत्याने जिल्ह्याबाहेर आहेत. 

मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर मेळाव्याचा कार्यक्रम साताऱ्यात झाला. या कार्यक्रमास शेखर गोरेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सध्या माण तालुक्‍यात राष्ट्रवादीला डोके टेकण्यासाठी शेखर गोरे यांचाच खांदा आहे. शेखर गोरेंना ताकद देण्यासाठी पक्षाने पोळ गटाकडे दूर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळीही शेखर गोरेंनी पोळ गटाला डावलले. त्यामुळे या दोन गटांचे फारसे जमत नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला शेखर गोरेंचाच आधार असेल. तसेच सध्या जिल्हा नियोजन समितीचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. माणमधील सदस्यांना या समितीवर स्थान मिळण्यासाठी गोरेंना पुन्हा सक्रिय व्हावे लागणार आहे. 
 

संबंधित लेख