sheikh hasina sweeps bangladesh election | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

बांगलादेशात शेख हसिना यांच्या आघाडीला 300 पैकी 288 जागा 

पीटीआय
सोमवार, 31 डिसेंबर 2018

ढाका : बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्या सत्ताधारी आघाडीने 288 जागा खिशात घालत दणदणीत विजय मिळविला आहे.

या विजयामुळे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा शेख हसिना यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मिळविलेला विजय हा हास्यास्पद असून, पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

सत्ताधारी अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने बांगलादेश संसदेच्या तीनशेपैकी 288 जागांवर विजय प्राप्त केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे सचिव हेलालुद्दीन अहमद यांनी आज दिली. एकूण मतदानापैकी सुमारे 82 टक्के मते अवामी लीग आघाडीला मिळाली आहेत.

या पक्षाने 2008मध्ये 263 जागांवर विजय संपादन केला होता. विरोधातील नॅशनल युनिटी फ्रंटला (एनयूएफ) फक्त 15 टक्के मते मिळाली असून, त्यांना सात जागांवर विजय मिळाला आहे. तर, इतर पक्षाला तीन जागांवर यश मिळाले आहे, असे अहमद यांनी स्पष्ट केले. एका मतदारसंघामध्ये मतदान पुढे ढकलण्यात आले असून, दुसऱ्या एका मतदारसंघात उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे निकाल घोषित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विजय हास्यास्पद : विरोधक 

भ्रष्टाचाराच्या खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या 72 वर्षीय खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला (बीएनपी) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीतील हा विजय हास्यास्पद असून, तटस्थ काळजीवाहू सरकार स्थापन करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी विरोधातील एनयूएफ आघाडीकडून करण्यात आली आहे.

या निवडणुकीत जवळजवळ सर्वच केंद्रांवर गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळे हा निकाल आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया एनयूएफचे प्रमुख कमाल होसैन यांनी व्यक्त केली. शेख हसिना यांच्या सरकारच्या काळात मुक्त वातावरणात निवडणुका होणे अशक्‍य असल्याचा आरोप बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फख्रूल इस्लाम अलमगीर यांनी केला आहे. 

संबंधित लेख