shehla rashid | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

"ज्यांनी पत्नीला सोडून दिले, त्यांनी मुस्लीम महिलांना शिकवू नये'! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना व पंतप्रधान झाल्यानंतर आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कधीही भेटलेले नाहीत. यावरूनच त्यांची संवेदनशीलता लक्षात येते. त्यांची धोरणे शेतकरी, कामगारांच्या विरोधात आहेत. 
-जिग्नेश मेवाणी 

पुणे : "ज्यांनी पत्नीला सोडून दिले. तिचा काही विचार केला नाही. त्यांनी तकालवरुन मुस्लीम महिलांना शिकवण्याचा आवश्‍यकता नाही', अशा शब्दांत जेएनयूतील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद हिने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

पुण्यात विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार, शेहला रशीद, जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तलाक आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या प्रश्‍नावर उत्तर देताना शेहला म्हणाली, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांनी एकमेकींना मदत केली पाहिजे. स्वतः:चा उत्कर्ष करून घेतला पाहिजे. जे लोक मुस्लीम महिलांबद्दल कळवळा दाखवत आहेत, त्यांचे मूळ रूप तपासले पाहिजे. योगी आदित्यनाथ यांच्या स्टेजवरुन मुस्लीम महिलांवर अत्याचार करण्याची भाषा व्हायची. या लोकांवर विश्‍वास कसा ठेवायचा ? महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी स्वतः: ची बायको सोडून दिली. तलाक न देता सोडून दिले. त्यांनी मुस्लीम महिलांना काय शिकवावे ?, असे शहेला म्हणाल्या. 

उणा आंदोलनानंतर आक्रमक नेता म्हणून पुढे आलेल्या जिग्नेशने मोदी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. सध्या धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. दलितांवर अत्याचार सुरू आहेत. राज्यघटना मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगारांशी त्यांना काहीएक देणेघेणे नाही. मोदी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कधी भेटलेले नाहीत. यावरून सर्वकाही समजून येते. त्यांनी कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे खच्चीकरण केले आहे, असेही जिग्नेश म्हणाला. 

 

संबंधित लेख