shashikant shinde about narendra patil descision | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

नरेंद्र पाटलांनी अजून भाजपप्रवेश केलेला नाही : शशिकांत शिंदे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

नरेंद्र पाटील राष्ट्रवादी पक्षात राहून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर काम करताना अध्यक्षपदाला योग्य न्याय देऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे मत राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. 

सातारा : नरेंद्र पाटील राष्ट्रवादी पक्षात राहून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर काम करताना अध्यक्षपदाला योग्य न्याय देऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे मत राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपच्या कोट्यातून निवड झाली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, आता त्यांच्याविषयी तुमची नेमकी भुमिका काय राहणार, असे विचारले असता आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, अद्याप नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. महामंडळावर काम करायचे असल्याने त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. पक्षात राहून ते महामंडळाच्या अध्यक्षपदास योग्य न्याय देऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा.

त्यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. माथाडी संघटनेत अनेक पक्षाचे लोक कार्यरत आहेत. माथाडी संघटनेचा व भाजपचा काहीही संबंध नाही. वैयक्तिक त्यांचा निर्णय भाजप सोबत असेल त्यावेळी माझा निर्णय हा राष्ट्रवादीसोबत असेल. त्यामुळे संघटनेच्या कामात पक्षिय राजकारण आड येऊ दिले जाणार नाही. अद्यापतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे योग्य वेळेची आम्ही वाट पाहू, असे आमदर शिंदे यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख