shashikant gade challenges shivaji kardile | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

शिवाजी कर्डिलेंनी वंदना कुसळकरांना निवडून आणावे, त्याक्षणी मी राजीनामा देईन!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 डिसेंबर 2018

गांधी, कर्डिले यांना तर पैशांची मस्ती आली आहे. 

नगर : आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात जादूची कांडी फिरविण्याची ताकद असेल, तर त्यांनी प्रभाग चारमधील वंदना कुसळकर यांना निवडून आणावे. मी माझ्या पदाचा त्याच क्षणी राजीनामा देईन, असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी कर्डिलेंना दिले आहे.

शिवसेनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर म्हणाले, एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले पैशांच्या जिवावर प्रचाराची धुरा राबवीत आहेत. मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवीत आहेत. कुठलीही परवानगी नसताना प्रचाराच्या व्हॅन शहरात फिरवत आहेत तर दुसरीकडे महापालिकेत सत्ता आल्यावर तीनशे कोटी रुपये देण्याचे गाजर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दाखविले आहे. थापा मारून जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे नेते करीत आहेत. गांधी, कर्डिले यांना तर पैशांची मस्ती आली आहे. 

अनिल राठोड, म्हणाले, की महापालिकेत सत्ता आल्यानंतर पुणे- मुंबईसारख्या दर्जेदार शहर बस सुरू करण्यात येतील. 

संबंधित लेख