shashikant bithday newsx | Sarkarnama

खासदारकीसाठी शशिकांत शिंदेंना संधी द्या : जावलीकरांचा आग्रह

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातुन कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास जावलीतील जनता जीवाचे रान करून त्यांना विजयी करेल, असा विश्वास जावली व साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला. 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातुन कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास जावलीतील जनता जीवाचे रान करून त्यांना विजयी करेल, असा विश्वास जावली व साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला. 

शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जावली तालुक्‍याच्या वतीने त्यांचा सत्कार झाला. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, मनोज पवार, जावळीच्या सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्तात्रय गावडे, सौरभ शिंदे, चंद्रकांत गावडे, तेजस शिंदे, महिला राष्ट्रवादी अध्यक्षा समिन्द्रा जाधव आदी उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,"" शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व जावलीनेच नव्हे, तर कोरेगावने ही मान्य केले आहे. शिंदे आता एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी जिल्हाध्यक्ष असताना राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट केली. सर्व आमदारात त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे.त्यामुळे त्यांनी राज्यात नवे तर देशात पातळीवर पाठवण्यासाठी पक्षाने प्रयत्न करावेत. 

वसंतराव मानकुमरे म्हणाले, सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी एका घरात दोन पदे नकोत. खासद्‌सरकीसाठी पक्ष्याने आता सक्षम व जनसमान्यांशी नाळ असणाऱ्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. शिंदेंनी माघार घेतल्यास मी लोकसभा लढविणार आहे. पक्ष्याने संधी दिली तर ठीक अन्यथा अपक्ष लढणार आहे. 

संबंधित लेख