shartrughana sinha appeal apposition come together | Sarkarnama

भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनो एक व्हा ! : शत्रुघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मुझफ्फरपूर: राफेल विमान खरेदी प्रकरणावरून भाजपमधील नाराज नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर देत केंद्र सरकारवर तोंडसुख घेतले. 

2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही सिन्हा यांनी केले. 

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झडत असताना, भाजपचे सिन्हा यांनी स्वपक्षावरच हल्लाबोल केला. येथे रविवारी आयोजित शेतकरी पंचायतीमध्ये बोलताना सिन्हा यांनी तिखट शब्दांत केंद्र सरकारवर टीका केली. या प्रसंगी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. 

सिन्हा म्हणाले, ""राफेल करार करताना केंद्र सरकारने या क्षेत्रातील मोठा अनुभव असलेल्या सरकारी मालकीच्या "एचएएल' कंपनीला बाजूला सारून कुठलाही अनुभव नसलेल्या नव्या कंपनीशी भागीदारी करण्यास डसॉल्ट कंपनीला भाग पाडले. याचा खुलासा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी एका मुलाखतीत केला आहे.'' 

संबंधित लेख