उपचार केल्यानंतर शरीफ यांना पुन्हा तुरुंगात हलविले 

उपचार केल्यानंतर शरीफ यांना पुन्हा तुरुंगात हलविले 

लाहोर: तुरुंगात शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचा दावा त्यांच्या वैयक्तिक डॉक्‍टरांनी केला आहे. शरीफ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी मात्र त्यास दुजोरा दिलेला नाही. शरीफ यांची प्रकृती फारशी गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे मंगळवारी शरीफ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. ते सध्या लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

सर्व चाचण्या आणि उपचार केल्यानंतर 69 वर्षे वयाच्या शरीफ यांना मंगळवारी पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. शरीफ यांच्यावर उपचार केलेल्या हृदयविकार तज्ज्ञांनी सांगितले की, त्यांची तब्येत फारशी गंभीर नसली तरी योग्य औषधे आणि नियमित तपासण्यांची त्यांना आवश्‍यकता आहे. 

""शरीफ यांना हृदयविकाराचा त्रास होत असून, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर तुरुंगात योग्य उपचार करणे शक्‍य नाही. त्यामुळे आवश्‍यक ते उपचार तातडीने मिळावेत म्हणून शरीफ यांना रुग्णालयात हलविण्याची आवश्‍यकता आहे,'' असा दावा शरीफ यांचे वैयक्तिक हृदयविकारतज्ज्ञ अदनान खान यांनी केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर शरीफ यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ""शरीफ यांच्या प्रकृतीबाबत मला माध्यमांमधूनच माहिती मिळत आहे,'' असे ट्विट शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी केले आहे, तर नवाज यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची मागणी त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी केली आहे. 
---  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com