sharada pawar felicitation in Roha on maonday | Sarkarnama

शरद पवार यांचा रविवारी रोह्यात सत्कार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 मार्च 2018

रोहा  : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा येत्या रविवारी (ता. 11) येथे पक्षातर्फे भव्य सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला 30 ते 35 हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्‍यता असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

शरद पवार यांनी राज्य विधिमंडळात; तसेच संसदेत केलेल्या कामगिरीबद्दल रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने हा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रोहा शहराजवळील म्हाडा मैदानावर सकाळी 11 वाजता हा सोहळा होईल. जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, तालुकाध्यक्ष मधुकर पाटील व अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू आहे. रोहा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीची रायगड जिल्ह्यातील संघटना मजबूत केली जात आहे. 

"हल्लाबोल'ची तयारी
कागल येथून दोन एप्रिलपासून येथून पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाला प्रारंभ होईल. मेमध्ये कोकणात सिंधुदुर्ग ते पालघर असे हल्लाबोल आंदोलन होणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. आतापर्यंतच्या हल्लाबोल आंदोलनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनातील प्रश्नांवर सरकार निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत ते चालूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख