sharad sugar factory elction news | Sarkarnama

शरद साखर कारखान्यावर शिवसेना आमदार भुमरेंचे वर्चस्व 

sarkarnama
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पैठण, जि. औरंगाबाद  : विहामांडवा (ता. पैठण) येथील शरद सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी एकूण २० पैकी १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. 

पैठण येथील तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. २६) निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. तहसीलदार महेश सावंत, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच भुमरे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी घोडके यांच्या पॅनेलच्या उमेदवाराविरुद्ध मतांची आघाडी घेतली. ऊस उत्पादक मतदारसंघातील पाच गटांत मतमोजणी सुरू असताना घोडके यांच्या पॅनेलचे उमेदवार कमी-अधिक प्रमाणात पुढे गेले; परंतु पुन्हा कमी मतदान झाल्याने मागे पडले. यानंतर भुमरे पॅनेलच्या उमेदवारांचा मतांचा आकडा वाढत गेला. 

भुमरे पॅनेलचे विजयी उमेदवार 
डॉ. सुरेश चौधरी, सुरेश दुबाले, विष्णू नवथर (ऊस उत्पादक गट : नवगाव), संपत गांधले, रावसाहेब घावट, शिवदास नरके (ऊस उत्पादक गट : टाकळी अंबड), महावीर काला, लहू डुकरे, ज्ञानोबा बोडखे (ऊस उत्पादक गट : विहामांडवा), सुभाष गोजरे, माणिक थोरे, नंदू पठाडे (ऊस उत्पादक गट : चौंढाळा), सुभाष चावरे, भरत तवार व आमदार संदीपान भुमरे (ऊस उत्पादक गट, कडेठाण), द्वारकानाथ काकडे व सुमन जाधव (महिला मतदारसंघ), कल्याण धायकर (अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ), सोमनाथ परदेशी (इतर मागासवर्गीय मतदारसंघ). 

घोडके पॅनेलचे विजयी उमेदवार 
श्रीकृष्ण तांबे (ऊस उत्पादक गट : टाकळी अंबड) व अनिल घोडके (विमुक्त भटक्‍या जाती-जमाती मतदारसंघ). 

संबंधित लेख