इच्छुक वाढल्याने आमदार रणपिसेंच्या अडचणी वाढल्या

 इच्छुक वाढल्याने आमदार रणपिसेंच्या अडचणी वाढल्या

पुणे : विधान परिषदेची पुण्यातील जागा पुण्याला मिळावी तीही पुण्यातील नव्या सदस्यांना मिळावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातील काही जणांनी थेट प्रदेशाध्यक्षांना गळ घातली असून त्यामुळे विद्यमान आमदार शरद रणपिसे यांच्या उमेदवारी मिळविण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. 

पुण्यातील जागेवर राज्यातील इतर कुणालाही उमेदवारी देऊ नये तसेच पुण्यातील इच्छुकांना संधी देताना प्राधान्याने आतापर्यंत आमदार न झालेल्या मात्र पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या तसेच नरगेसवक असलेल्यांना उमेदवारी द्यावी, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अभय छाजेड, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेक इच्छुकांचा यात समावेश आहे. 

आमदार रणपिसे हे पूर्वी एकदा विधानसभेवर त्यानंतर गेली अनेक वर्षे विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांना पक्षाने पुरेशी संधी दिली आहे. त्यामुळे आता शहरात अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांना आमदार होण्याची संधी मिळावी. गेल्या अनेक वर्षात पक्षासाठी कुणी किती काम केले याचाही विचार व्हावा, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आमदार रणपिसे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्नदेखील सुरू आहेत. पक्षाचे तीन आमदार निवृत्त होत असून विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार पक्षाचे दोनच आमदार निवडून येऊ शकतात. माणिकराव ठाकरे हे विधान परिषदेचे उपसभापती आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. मात्र उर्वरित एका जागेसाठी अनेक इच्छुक पुढे आल्याने स्पर्धा वाढली आहे. विद्यमान आमदार रणपिसे यांना पुन्हा संधी देऊ नका नव्यापैकी कुणालाही दिली तरी चालेल ही भावना जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुन्हा उमेदवारी मिळविणे रणपिसे यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com