Sharad Pawar`s Junnar tour creates intrest among all parties | Sarkarnama

शरद पवारांच्या जुन्नर दौऱ्याची सर्वपक्षीय कार्यकत्यांना उत्सुकता

दत्ता म्हसकर
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जुन्नर : ज्येष्ठ नेते शरद पवार दीर्घ कालावधीनंतर जुन्नर तालुक्‍यात बुधवार ता.25 रोजी सार्वजनिक कार्यक्रमासाठी येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत मोठी उत्सुकता आहे. 

बुधवारी सकाळी ओझर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार असून यानंतर निवृतीनगर-धालेवाडी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ नंतर जाहीर सभा आहे.

जुन्नर : ज्येष्ठ नेते शरद पवार दीर्घ कालावधीनंतर जुन्नर तालुक्‍यात बुधवार ता.25 रोजी सार्वजनिक कार्यक्रमासाठी येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत मोठी उत्सुकता आहे. 

बुधवारी सकाळी ओझर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार असून यानंतर निवृतीनगर-धालेवाडी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ नंतर जाहीर सभा आहे.

माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आठ वर्षापूूर्वी शरद पवार यांची जाहीर सभा तालुक्‍यात झाली होती. यानंतर जाहीर कार्यक्रमासाठी ते प्रथमच येत आहेत तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर गळीत हंगामाच्या निमित्ताने ते सुमारे सतरा वर्षांनंतर येत आहेत. या दोन्ही कार्यक्रमात ते काय बोलणार याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्याबरोबर सर्वसामान्यांना आहे. 

विधानसभा निवडणूकीनंतर बाजार समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेसमधील गटाचे तटाचे राजकारण उघड पडले आहे. ऍड संजय काळे दुरावले गेले असल्याची चर्चा आहे. नगर पालिका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निविडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसने बाजी मारली असली तरी जुन्नरचा नगराध्यक्ष व पंचायत समितीचे सभपतीपद मिळविण्यात पक्षाला यश मिळाले नाही. जिल्हा परिषद निवडणूकीत एक गट व दोन गणात बंडखोरी झाली होती. मेळाव्याच्या निमित्ताने अंतर्गत गटतटाऐवजी पक्षात एकसंघपणा राखण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्याकडून कानमंत्र दिला जाण्याची शक्‍यता आहे.

विघ्नहर सहकारी साखर कारखाना कॉग्रेसकडे असला तरी शरद पवार यांचे या कारखान्यावर विशेष प्रेम आहे. सहकारी साखर कारखाना कसा चालवावा हे विघ्नहरकडून शिका, असे त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे सांगितले आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार निवृत्तीशेठ शेरकर व माजी अध्यक्ष सोपानशेठ यांच्यानंतर सत्यशील शेरकर यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली तसेच कारखान्याचा कारभार सचोटीने व पारदर्शकपणे करुन विविध पारितोषिके मिळविली आहेत.

सत्यशील यांच्या युवा नेतृत्वाचा कारभार देखील पवार साहेब या निमित्ताने जवळून पाहणार आहेत. याचबरोबर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आलेला दुरावा कमी करण्यास त्यांचा दौरा उपयुक्‍त ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जुन्नर तालुक्‍यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग व असंख्य कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे यामुळे पक्षातील दुरावलेली मने एकसंघ करुन तालुकयात पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी पवारांचा हा दौरा उपयोगी ठरणार का हाच खरा प्रश्न आहे.

संबंधित लेख