sharad pawar sugetion to maratha andolan | Sarkarnama

मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढा! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट कलमात बदल केल्यास मराठा आरक्षण शक्‍य आहे. यासाठी राज्याची व केंद्राची सत्ता असलेल्या भाजपने लोकसभेत घटना दुरुस्ती करुन घ्यावी. राज्यसभेत भाजपचे संख्याबळ कमी असले, तरी तेथे अन्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. 

घटनादुरूस्तीच्या निर्णयाचा अन्य राज्यातील घटकांनासुद्धा न्याय मिळेल, असे सांगत त्यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला खड्यासारखे बाजूला काढा आणि तुमचे ऐक्‍य कायम ठेवा, असा सल्लाही दिला. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला त्यांनी आज भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टाने रद्दबातल केल्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, यासाठी आम्ही देशातील उत्तमातील उत्तम वकिलांशी चर्चा केली आहे. घटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली तर मार्ग निघू शकतो. त्यासाठी लोकसभेत आवश्‍यक बहुमत मिळाले पाहिजे. आमच्या पक्षाच्या चारपैकी खासदार धनंजय महाडिक व सुप्रिया सुळे या दोघांनी संसदेत आरक्षणाची भूमिका मांडली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संबंधित लेख