Sharad pawar Solapur news | Sarkarnama

 दलित मित्र भीमराव जाधव गुरुजींनी भटक्‍या विमुक्तांसाठी आयुष्य वेचले : शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

सोलापूर :  सोलापूरचे माजी महापौर दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी यांनी  भटक्‍या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी आयुष्य वेचले, "असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद  पवार यांनी येथे केले . 

सोलापूर :  सोलापूरचे माजी महापौर दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी यांनी  भटक्‍या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुजींनी आयुष्य वेचले, "असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद  पवार यांनी येथे केले . 

दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी यांच्या पुतळ्याचे अनावरण  गुरुवारी सोलापूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  उपस्थितीत झाले. 
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार ऍड. शरद बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, माजी खासदार धर्माण्णा सादूल, माजी आमदार लक्ष्मण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले,"समाजसेवेचे वचन घेत त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. भटक्‍या-विमुक्तांना तारेच्या कुंपणाबाहेर काढून त्यांचे संसार उभे केले. भ'टक्‍या विमुक्त समाजाबाबत नोकरशाहीचा दृष्टीकोन बदलावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आजही एखादी मोठी घटना झाली की याच समाजाच्या लोकांवर संशय व्यक्त केला जातो. हे चित्र बदलण्यासाठी गुरुजींनी आपले आयुष्य खर्ची घातले.'' 

"सोलापूरच्या महापौरपदासा'ठी जेंव्हा गुरुजींचे नाव आले, त्यावेळी त्यांच्या नावाला तत्काळ मंजुरी दिली. उपेक्षित, गरीब, वंचित वर्गाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर 'ठेवूनच हा निर्णय घेतला होता. महापौरपदाची मुदत संपल्यानंतरही गुरुजी गप्प बसले नाहीत. आपल्या समाजातील युवक हा सुशिक्षित झाला पाहिजे, तोही इतरांप्रमाणे मुख्य प्रवाहात वावरला पाहिजे यासा'ठी गुरुजींनी प्रयत्ने केले'', असेही श्री. पवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा गुरुजींचे चिरंजीव भारत जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

संबंधित लेख