पवार साहेब सर्वच सामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे पाहुणे आहेत ! 

हृदयात स्थानआम्ही परतल्यानंतर शरद पवारांबाबत जे ऐकून होतो ते सर्व खरं आणि आपल्या बाबतीत घडल्याने त्यांच्याबद्दल असलेलं आकर्षण कैक पटीने वाढले. दौरा उरकून परतताच छातीवर ‘शरदचंद्र’ अस नावं गोंदून घेतले आजही माझ्या छातीवर साहेबांचे नाव मी अभिमानाने वागवतो आहे.
Pawar-with-Bajgude
Pawar-with-Bajgude

 मी डोंगरकुशीत शेती असल्याने पारंपारिक पिके घेत होतो. पण, शरद पवार मुख्यमंत्री असताना १९८९ मध्ये शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना सुरु केली आणि आपण दिड एकर आंब्याची बाग लावली. फळबागेची आवड वाढून शेतीतील विविध प्रयोगांबद्दल बहुमान मिळायला लागले.

त्यामुळेच शरद पवारांबद्दल आकर्षण वाढू लागले. आसपास पवारांच्या सभा असतील तर ऐकायला जायचो. शेतीतील प्रयोगामुळे परिसरात चांगली ओळख झाल्याने स्थानिक राजकारण्यांनी बाजार समितीचा संचालक आणि राज्य मार्केटींग फेडरेशन संचालक पदावर संधी दिली. 

 युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये  जागतिक मराठी परिषदेसाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ इस्त्रायला जाणार होते. कृषी, साहित्य, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मंडळींचा या शिष्टमंडळात समावेश होता. तत्कालिन कृषी आयुक्त रामकृष्ण मुळे यांनी माझा शिष्टमंडळात समावेश केला .  परदेशात जायचे असल्याने मनात मोठी भिती होती. 

१८ जुलै १९९५ रोजी गेलेले शिष्टमंडळाचा  दहा दिवस इस्त्रायल तर तीन दिवस इजिप्तचा दौरा होता. शिष्टमंडळातील आपण एकमेव भगवा फेटा घातलेले होतो. तर, धोतर असणाऱ्यांमध्ये माझ्यासह सध्याचे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, मंत्री शेख साबेर, गजानन किर्तीकर, अनिल देशमुख, सुरेश प्रभु आदी मंडळी सोबत होती. 

  दरम्यान, आमच्या इस्त्रायलच्या दहा दिवसांच्या दौऱ्यातील नऊ दिवस संपले होते. विविध ठिकाणी भेटी, माहिती घेऊन झाले होते. शेवटच्या दिवशी केवळ मनोरंजन करण्यासाठी पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या होत्या. पण, इजिप्तचा तीन दिवसांचा   व्हिजा   नसल्याने मी अस्वस्थ होतो. शिकलोलो नाही ,  व्हिजा नसल्याने पकडून ठेवले तर ? अशी भीती मनात होती. रात्रीच्या वेळी आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये मनोहर जोशी आले. आपली कैफियत त्यांच्या कानी घालून काही मार्ग निघतो का हे पाहण्यासाठी त्यांच्या भेटीचा प्रयत्न करत होतो. पण, कलावंत, उद्योगपतींनी त्यांना गराडा घातला होता. मला त्यांना भेटता आले नाही.

 याच वेळी आयुर्विमा कंपनीत अधिकारी असलेल्या सुनिता जोशींचीही हीच अडचण होती. जोशी मला म्हणाल्या, तुम्ही फक्त सोबत रहा माझाही व्हिजा नाही. आपण काही तरी करु.  नंतर आम्ही सर्व पांगलो. रात्री सर्वजण दुसऱ्या दिवसाच्या फिरण्‍याचे नियोजन करत होते. मी मात्र अस्वस्थत होतो .  त्यावर साबेर शेख जवळ येऊन धीर देत म्हणाले, छत्रपतींच्या महाराष्ट्रातले तुम्ही मावळे आणि काय घाबरायले? . 

आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्येच शरद पवारही उतरलेले होते. ते वेगळ्या दौऱ्यासाठी आलेले होते. एक आकर्षण म्हणून मला त्यांना भेटावे वाटले. मी जोशीबाईंना म्हणालो, मॅडम थांबा , मी साहेबाना  दोन मिनीटे भेटून येतो. बाईंनी हसत हसत  सर्व पुढारी सारखे असतात अशी प्रतिक्रीया दिली. 

पण, मी पवारांच्या खोलीत गेलो तेव्हा ते कोटाचा टाय बांधत होते. मला पाहून म्हणाले, " बजगुडे कसा चाललाय दौरा, परदेशात करमतय का? आज माझ्यासोबत चला क्युबूत (आपल्याकडे जशी टरबुज वाड्या, फुलशेती असतात तशा तिकडे क्युबूत हा प्रकार आहे) पाहून येऊ. मी म्हणलो, साहेब कसल क्युबूत अन॒ कसल काय, माझा इजिप्तचा व्हिजा नाही. हे सगळे मेहुण्या, पाहुण्याना  घेऊन मजा करायला आलेत असं कदरुन बोललो. त्यावर पवार साहेब म्हणाले, तसं बोलायचं नसतं, काळजी करु नका. 

त्यांनी आवाज दिला आणि चालकाला बोलावून घेतले. त्याच्यासोबत जा माझी गाडी घेऊन, तुमचा व्हिजा काढून परत इथे आणून सोडेल. आम्ही गाडीत बसताना कळाले कि ही शरद पवारांच्यासाठी तेथील प्रशासनाने पाठवलेली  गाडी आहे .  शरद पवार  स्वत:साठी दुसरी कार भाड्याने मागवून त्यांच्या कामासाठी गेले . साहेबांनी आम्हाला व्हिजा मिळेल अशी व्यवस्था केली होती .  साहेबांसाठी असलेल्या गाडीत बसताना जोशीबाईंना म्हणालो, सगळे पुढारी सारखे नसतात, पवारांसारखे देव माणस  पण असतात. त्यावर बाई हसत हसत म्हणाल्या, साहेब तुमचे पाहुणे आहेत का?  मी म्हणालो, पवार साहेब सर्वच सामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे पाहुणे आहेत.
 मग, आम्ही तेथून ८० किलोमिटर अंतरावर असलेल्या कैरोला (इजिप्तची राजधानी) जाऊन व्हिजा घेऊन आलो. 

फिरायला गेलेलं शिष्टमंडळ परतलं नसल्यानं मी हॉटेलच्या पायऱ्यावर बसलो होतो. काही वेळाने शरद पवार त्यांचे काम उरकून आले होते. ते दिसताच मी उठलो, पवारांनी जवळ घेऊन विचारलं व्यवस्थित झालं का? यावरुनच कळले की साहेबांचं  शेवटच्या घटकापर्यंत किती लक्ष आहे. 

दरम्यान, तेव्हापासून आजतागायत मी दरवर्षी  बारामतीला जाऊन त्यांना आपल्या बागेतले आंबे भेट देतो. पवारांना आपल्या बागेतल्या आंब्याची  चव एवढी आवडली कि दौऱ्यात कुठेही दिसलो कि, वाहन थांबवून ‘जीवनराव आंब्याची पेटी कुठेय’ असा साहेबांचा प्रश्न असतो. मग मी हसत हसत म्हणतो  ही काय आणलीय . 

हृदयात  स्थान

आम्ही परतल्यानंतर शरद पवारांबाबत जे ऐकून होतो ते सर्व खरं आणि आपल्या बाबतीत घडल्याने त्यांच्याबद्दल असलेलं आकर्षण कैक पटीने वाढले. दौरा उरकून परतताच  छातीवर ‘शरदचंद्र’ अस नावं गोंदून घेतले आजही माझ्या  छातीवर साहेबांचे नाव मी अभिमानाने वागवतो  आहे.

(शब्दांकन : दत्ता देशमुख )
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com