सुदैवाने माझी करंगळी मोदींच्या हातात सापडली नाही : शरद पवार

मोदी कितीही म्हणाले की मी पवारांची करंगळी धरुन राजकारणात आलो तरी त्याला अर्थ नाही, सुदैवाने माझी करंगळी मोदींच्या हातात कधीच सापडली नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'पवार आपले राजकीय गुरु आहेत,' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पूर्वी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
सुदैवाने माझी करंगळी मोदींच्या हातात सापडली नाही : शरद पवार

पुणे : मोदी कितीही म्हणाले की मी पवारांची करंगळी धरुन राजकारणात आलो तरी त्याला अर्थ नाही, सुदैवाने माझी करंगळी मोदींच्या हातात कधीच सापडली नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'पवार आपले राजकीय गुरु आहेत,' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पूर्वी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली.

राजकीय संस्कृती कशी असावी याबाबत प्रश्नोत्तरे सुरु असताना 'तुमचा शिष्य तुमचं ऐकतो का' असा खोचक प्रश्न राज यांनी पवार यांनी विचारला. त्यावर पवार यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, "मी कृषीमंत्री असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री परिषदेत मोदी तेव्हाचे पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तीगत हल्ला करायचे. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री त्यांच्यावर नाराज असत. त्यामुळे गुजरातच्या प्रश्नांबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांचा दृष्टीकोन अनुकूल नसायचा. माझी भूमिका मात्र, गुजरात हा देशाचा भाग असल्याने गुजरातच्या जनतेचा काही दोष नाही अशी असायची,"

पवार पुढे म्हणाले, "गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा राग तेथील जनतेवर काढायचा नाही, या माझ्या भूमिकेमुळे मोदी त्यावेळी माझ्या घरी येत. त्यांचे प्रश्न मांडत. मी गुजरातच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून मी ते प्रश्न मध्यस्थी करुन सोडवण्याचा प्रयत्न करत असे. त्यातून मोदी म्हणाले असावेत की मी पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो. त्यात काही अर्थ नाही. आमच्यात व्यक्तिगत सलोखा आहे. पण सुदैवाने माझी करंगळी मोदींच्या हातात कधी सापडलेली नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com