शरद पवारांकडून खासदार महाडीक बेदखल ! 

मुश्रीफ-महाडीक अबोलाचया दौऱ्यात श्री. मुश्रीफ हेही डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी आले. त्यावेळी श्री. महाडीक यांनी त्यांचे चरणस्पर्श करून विचारपूस केली. पण त्यानंतर श्री. पवार निघून जाईपर्यंत या दोघांतही अबोलाच राहीला. श्री. पवार पत्रकार परिषदेत घेत असताना दोघे त्यांच्या बाजूला होते. श्री. महाडीक यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट नाराजी दिसत होती.
 शरद पवारांकडून खासदार महाडीक बेदखल ! 
शरद पवारांकडून खासदार महाडीक बेदखल ! 

कोल्हापूरः लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीपासून दुरावलेले खासदार धनंजय महाडीक यांना आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बेदखल केले. गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा पुढे सरसावलेल्या श्री. महाडीक यांच्याऐवजी श्री. पवार यांनी आर. के पोवार यांना जवळ बोलवून त्यांच्याकडून स्वागत स्विकारले. 

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या भेटीसाठी श्री. पवार आज कोल्हापुरात होते. रूईकर कॉलनीतील डॉ. पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर महापौर हसिना फरास, श्री. महाडीक यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष राजू लाटकर आदि उपस्थित होते. 

दुपारी एकच्या सुमारास श्री. पवार यांच्या वाहनांचा ताफा डॉ. पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर थांबला. श्री. पवार खाली उतरताच श्री. महाडीक त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छासह पुढे सरसावले पण श्री. पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आर. के. यांना बोलवून घेतले. आर. के. यांच्याकडील पुष्पगुच्छ स्विकारला. त्यावेळी श्री. लाटकर सोबत होते. या घडामोडीनंतर श्री. महाडीक यांचे स्वागत त्यांनी स्विकारले. 

गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीचे खासदार असूनही जिल्ह्यात श्री. महाडीक हे पक्षासोबत नाहीत. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते पक्षाच्या व्यासपीठावरही दिसले नाहीत. यावरू जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना खासदारांनी आता आपली भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. पण त्याकडेही श्री. महाडीक यांनी दुर्लक्ष केले होते. आज पवार यांच्या दौऱ्यात त्यांना बेदखल करण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com