sharad pawar in nagar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नोकरी मार्गदर्शन केंद्रासाठी " जिल्हा मराठा' ला पाच लाख देवू : पवार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

नगर : नगर शहरात नोकरी मार्गदर्शन केंद्र होणे आवश्‍यक आहे. अशा केंद्रातून अधिकारी बनतील. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे काम चांगले आहे. त्यांनी या केंद्रासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आम्ही पाच लाखाची मदत देवू, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने 101 व्या वर्षात पदार्पण केले. शतकोत्तर महोत्सवानिमित्त पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार दिलीप वळसे पाटील तसेच इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, खजिनदार जी. डी. खानदेशे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. याबाबत बोलताना पवार म्हणाले, की सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. नवीन पिढी विज्ञानाची आस्था असणारी अशी घडविण्यासाठी संस्थेने काम करावे. त्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे. नगरमध्ये नोकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यानी मार्गदर्शन करण्याची भूमिका घ्यावी. त्यासाठी आपण मदत करू. या वेळी मान्यवरांची भाषणे झाली. 

संबंधित लेख