शरद पवारांनी अडवले गुजरातकडे जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी

पश्‍चिमवाहिनी नद्यांचे गुजरातला जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी आता गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे. या पाण्यावरुन गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सर्वेक्षण करुन योजनांचे नियोजन केले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी नाराजी होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तज्ज्ञांसमवेत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना सुचना केली होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गुजरातला जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी आता अडणार आहे.
शरद पवारांनी अडवले गुजरातकडे जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी

नाशिक : पश्‍चिमवाहिनी नद्यांचे गुजरातला जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी आता गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे. या पाण्यावरुन गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सर्वेक्षण करुन योजनांचे नियोजन केले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी नाराजी होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तज्ज्ञांसमवेत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना सुचना केली होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गुजरातला जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी आता अडणार आहे.

मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजना, पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी मिळाली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकला झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2009 मध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळवली होती. त्यामुळे गुजरातला जाणारे हक्काचे पाणी अडविण्यास चालना मिळेल.

यामध्ये सुरगाणा तालुक्‍यातील मांजरपाडा तर दिंडोरी तालुक्‍यातील गोळशी महाजे, ननाशी, पायर पाडा, प्रिंप्रज, आंबेगाव, झार्लीपाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचापाडा, रानपाडा, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे. या प्रवाही योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी भुजबळांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेल्या मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजनांचा उर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये समावेश आहे. मात्र, उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालाचा प्रस्ताव मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडे पडून असल्याने प्रवाही वळण योजनांची अंतिम टप्यातील कामे रखडलेली होती. मागील महिन्यात जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. छगन भुजबळ यांनी आर्थररोड तुरुंगातून पत्रांद्वारे व विधानसभा प्रश्नांद्वारे सतत पाठपुरावा केला होता. भुजबळांच्या प्रयत्नाला यश मिळाले. त्यामुळे प्रकल्पातील रखडलेली कामे मार्गी लागतील.

भाजप- शिवसेना सरकारने भुजबळांनी योजनेसाठी पाठपुरावा केल्याने राजकीय कुरघोडी करण्यासाठी या प्रकल्पाची चौकशी लावली होती. तांत्रिक सल्लागार समितीकडून प्रकल्पाची तपासणी झाली. यामध्ये राजकीय वादात योजना तीन वर्षे रखडली. भुजबळांच्या पाठपुराव्याने उशिरा का होईना शासनाला त्याची उपयुक्तता समजली आहे - आमदार जयवंतराव जाधव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com