sharad pawar in mahabaleshwar | Sarkarnama

शरद पवार महाबळेश्‍वर मुक्कामी !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017
सातारा : धकाधकीच्या जीवनात विरंगुळा मिळावा, कुटुंबाला निवांत वेळ देता यावा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या आपल्या कुटुंबीयासह महाबळेश्‍वरला मुक्कामी आले आहेत, मात्र कार्यकर्त्यांच्या मोहोळाने त्यांचा निवांतपणा हिरावून घेतला आहे. भिलार या पुस्तकांच्या गावास भेट द्यावयास गेलेल्या पवारांचा पूर्ण वेळ कार्यकर्त्यांच्या गराड्यातच गेला.

शरद पवार आपल्या कुटुंबीयासह महाबळेश्‍वरला मुक्कामी आले आहेत. पण कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि पुस्तकांचे गाव म्हणून नव्याने ओळख झालेल्या भिलारला भेट देण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्री. पवार भिलारमध्ये दाखल झाले. श्री. पवार यांच्या या दौऱ्याने भिलारसह महाबळेश्‍वर तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले. बघता बघता ही माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि कार्यकर्ते भिलारमध्ये पोहोचले. श्री. पवार यांनी भिलारमधील ग्रंथालये केलेल्या घरांना भेट देऊन काही पुस्तकेही चाळली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. बाळासाहेब भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सरपंच वंदना भिलारे यांच्या घरातील ग्रंथालयातील पुस्तकांचे अवलोकन केले. त्यानंतर बाळासाहेब भिलारे आणि भि. दा. भिलारे यांच्या घरी भेट दिली. श्री. पवार हे आठ मेपर्यंत महाबळेश्‍वर मुक्कामी आहेत. दुसऱ्या दिवशी साताऱ्यातील कर्मवीर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

संबंधित लेख