शरद पवार यमाच्या दाराला कुलूप लावणारा नेता  - हसन मुश्रीफ 

musshriff on pawar
musshriff on pawar

मुंबई : कँन्सरसारखा दुर्धर आजार झाला असतानाही इच्छाशक्तीच्या जोरावर पवारसाहेबांनी त्यावर मात केली. त्यामुळे शरद पवार म्हणजे यमाच्या दाराला कुलूप लावून परत आलेला नेता असल्याचे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले होते.

विधानसभेत पद्मविभूषण शरद पवार यांच्या पन्नास वर्षाच्या संसदीय कारकीर्द पूर्ततेनिमित्ताने सरकारच्यावतीने मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावेळी ते बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, " संकटाला कसं भिडायचं हे शरद पवारसाहेबांकडून शिकलो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला साहेबांमुळेच न्याय मिळू शकला. मला आमदारकीचे उमेदवारी देताना सगळ्यांना काळजी होती की, हा अल्पसंख्यांक समाजातील ! मला बहूसंख्यांक लोकांची मते मिळतील का ? मात्र साहेब माझ्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले. "

"मला आई वडिलांनी जन्म दिला आहे, परंतू साहेबच माझे राजकीय मार्गदर्शक आहेत. पुरोगामी विचारांची खाण असलेले साहेब माझ्यासाठी दैवत आहेत. माझ्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो. साहेब दुर्दम्य आजारावर मात करत सामान्य माणसांच्या आशीर्वादाच्या बळावर आभाळाएवढे मोठे झाले आहेत. यमाच्या दाराला कुलूप लावून साहेब आले आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो," असे सांगताना आमदार हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com