sharad pawar enquires about R .R Patil`s brother | Sarkarnama

शरद पवारांनी आऱ. आर. आबांच्या dysp बंधूची आस्थेने केली चौकशी

भूषण पाटील
रविवार, 29 जुलै 2018

कोल्हापूर : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. आबा पाटील यांचे बंधू राजाराम पाटील (आर. आर. तात्या पाटील) हे पोलिस उपअधीक्षक म्हणून कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल कोल्हापूर दौऱ्यावर असताना डीवायएसपी आर. आर. पाटील हे बंदोबस्तावर होते. ते बंदोबस्तावर असल्याचे कळताच स्वतः शरद पवार यांनी त्यांना जवळ बोलावून चौकशी केली. त्यांना कौटुंबिक हालहवाल विचारत पाटील कुटुंबियांबद्दलचा जिव्हाळा दाखवला.

डीवायएसपी आर. आर. पाटील हे शाहूवाडीचे पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. पवार हे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नासाठी कोल्हापुरातील हाॅटेल सयाजीमध्ये आले होते. त्यांच्या मोटारीच्या ताफ्याच्या पायलट कारमध्ये आर. आर. पाटील हे होते. खासदार धनंजय महाडिक, खासदार सुप्रिया सुळे हे या वेळी शरद पवार यांच्यासोबत होते.

खासदार महाडिक यांनी पवार यांनी आर. आर. पाटीलही येथे असल्याचे सांगितले. लग्न सोहळा झाल्यानंतर पवार यांनी आवर्जून पाटील यांना जवळ बोलावून घेतले. कौटुंबिक विचारपूस केली. काही मिनिटे हा संवाद चालला. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी मग त्यांच्या मोबाईलमधून हा क्षण टिपला. आर. आर. आबा यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांनी आस्थेने पाटील यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिले. तोच जिव्हाळा त्यांनी तात्यांशी दाखवला. त्यामुळे सोशल मिडियात हा चर्चेचा विषय झाला.   

संबंधित लेख