sharad pawar criticise bjp goverenment | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भाजप सरकार म्हणजे राष्ट्रीय आपत्ती : पवार   

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

सरकारला राममंदिराची समस्या भेडसावत आहे.

मुंबई  : "भाजपच्या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. कामगारांबद्दल आदर नाही. केवळ अदानी व अंबानी यांच्या हिताची जोपासना करणारे हे सरकार म्हणजे शेतकरी व कामगारांवरची राष्ट्रीय आपत्ती आहे. या सरकारला उलथवून टाकण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज किसान सभेने आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत बोलताना व्यक्‍त केले. 

ते म्हणाले, की सध्या देशात दुष्काळाचे सावट भीषण असताना या सरकारला राममंदिराची समस्या भेडसावत आहे. पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला रोजगार नसताना आश्‍वासनांचा हिशेब देण्याची वेळ आली तेव्हा राममंदिराच्या नावाने देशात विद्वेष पसरविण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांचा सर्वाधिक विपरीत परिणाम 62 टक्के लोकसंख्येवर होत आहे. यात शेतकरी व कामगारांचे बळी जात आहेत, असे ते म्हणाले. 

मोदींच्या चुकीच्या धोरणाने अर्थव्यवस्था संकटात आली आहे. हे पाप या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे, हे सरकार एक राष्ट्रीय आपत्ती असून, ते उलथवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊनच संघर्ष करण्याची वेळ आल्याचे आवाहन पवार यांनी केले. 
 
राफेल विमान खरेदीप्रकरणी बोलताना पवार यांनी सरकारच्या धोरणावर संशय व्यक्‍त केला. देशाच्या संरक्षणासाठी "राफेल' खरेदी केले, याबाबत कोणाला शंका नाही; पण या विमानाची खरेदी किंमत देशाच्या जनतेला कळणे हा अधिकार आहे. भाजपच्याच केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संसदेत या विमानाची किंमत 670 कोटी असल्याचे सांगितले होते, तर त्यांच्याच दुसऱ्या ज्येष्ठ मंत्र्यांनी किंमत 1400 कोटी असल्याचे सांगितले. ही तफावत का, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

संबंधित लेख