sharad pawar on bjp goverenment | Sarkarnama

भाजपाला पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नाही : पवार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 ऑगस्ट 2017

भारतीय जनता पार्टीला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे, पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहित नाही. कदाचित म्हणूनच भ्रष्टाचारी मंत्र्यावर त्यांच्याकडून कारवाई होत नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात लगावला. 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे, पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहित नाही. कदाचित म्हणूनच भ्रष्टाचारी मंत्र्यावर त्यांच्याकडून कारवाई होत नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात लगावला. 

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सरकार विरोधात वातावरण असताना विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम दिसत नाही यावर बोलताना "तुम्हाला आम्ही काय करावे असे वाटते ? असा प्रतीप्रश्‍न पत्रकारांनाच करून ते म्हणाले, "विधीमंडळात भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत अतिशय गांभीर्याने प्रश्‍न उपस्थित केले, चर्चा झाली, पुरावेही सादर केले. यावर राज्य सरकार किंवा राष्ट्रीय नेतृत्त्वाकडून काही निर्णय घेण्याची आवश्‍यकता होती. आम्ही जे ऐकतो ते "ना खाऊंगा, ना खाने दुँगा' ही स्लोगन खरी होते असे काय दिसत नाही. या सगळ्या प्रश्‍नांकडे हायकमांड गांभीर्याने बघत नाही. तोपर्यंत सामान्य नागरीकांचा सरकारवर विश्‍वास बसणार नाही.' 

कॉंग्रेस राजवटीत भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात होता. तशी नैतिकता भाजपच्या मंत्र्यात दिसत नाही प्रश्‍नावर ते म्हणाले,"आम्ही सत्तेत फार वर्षे होतो. फार वर्षांनी आम्ही सत्तेतून बाहेर गेलो. त्यावेळी आरोप झाले की राजीनामा घ्या आणि चौकशी करा, कारवाई करा ही भुमिका असायची. सद्याच्या सरकारमध्ये मी समजू शकतो त्यांना बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे, पुन्हा सत्ता मिळेल का नाही याची खात्री नाही, कदाचित त्यामुळेच असे निर्णय ते घेत नसावेत.' 
 

संबंधित लेख